Chh. Sambhajinagar News : नैसर्गिक आपत्तीने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ७७ हजार ८७ शेतकऱ्यांच्या ५४ हजार ९८.७८ हेक्टरवरील कपाशी पिकाचे प्रचंड मोठ नुकसान केले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड हे तीनही जिल्हे कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. .तीनही जिल्हे मिळून सरासरी १० लाख ३४ हजार ७४८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८ लाख १६ हजार २६९.२८ हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड झाली होती. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सरासरी ७८ टक्केच लागवड झालेल्या कपाशीवर नैसर्गिक आपत्तीने मोठा आघात केला..Crop Damage : उरलं सुरलं पीकही नेलं; आता जगायचं कसं.कृषी महसूल व पंचायत विभागाच्या एकत्रित अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात तीनही जिल्ह्यातील एकूण ६ लाख ४६ हजार ३३७ हेक्टरवरील कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. .Rain Crop Damage : पश्चिम विदर्भात जोरदार पावसाने कापूस, सोयाबीनचे नुकसान.यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २ लाख ६० हजार ४१९ हेक्टरवरील कपाशी पिकांसह, बीड जिल्ह्यातील २ लाख १ हजार ८२४ हेक्टर तर जालना जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार ९४ हेक्टरवरील कपाशी पिकाचा समावेश आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकट्या पैठण तालुक्यातील ७७ हजार ८७ शेतकऱ्याच्या ५४ हजार ९८.७८ हेक्टरवरील कपाशी पिकाचा समावेश आहे..तालुकानिहाय नुकसान स्थितीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नुकसान झालेल्या कपाशी क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यांतील २८५४३ हेक्टर, फुलंब्री १६७५२ हेक्टर, वैजापूर ३१६९१ हेक्टर, गंगापूर ४४२९१ हेक्टर, खुलताबाद ८४४३ हेक्टर,सिल्लोड २३८८३ हेक्टर, कन्नड २९५४१ हेक्टर तर सोयगाव तालुक्यांतील २३१७५ हेक्टर कपाशी क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रानी दिली. नुकसान भरपाई संदर्भात शासनाच्या निर्णयानुसार ८५०० रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.