Parbhani News : यंदाच्या (२०२५-२६) हंगामात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रावर हमीभावाने( किमान आधारभूत किंमत दराने प्रतिक्विंटल ८११० रुपये) कापूस विक्रीसाठी कपास किसान या मोबाईल अॅप व्दारे शेतकऱ्यांना घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. .सोमवार (ता. १) पासून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून ३० सप्टेंबर पर्यंत मुदत आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यात सीसीआयची १३ केंद्र आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कपास किसान या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतःच्या नोंदणीसाठी गुगल स्टोर मधून कपास किसान अँप डाऊनलोड करावे लागेल. या अॅपमध्ये स्वतःचा मोबाईल क्रमांक नमूद केल्यानंतर शेतकरी नोंदणीची प्रक्रिया करता येईल..पत्ता, जमीनी बाबतची माहिती भरल्यानंतर शेतकऱ्याचे छायाचित्र, आधाराकार्ड, २०२५-२६ मधील कापूस लागवडीची ई-पीक पेरा नोंदणी केलेला महसूल विभागाने योग्यरीत्या प्रमाणित केलेला ऑनलाइन अद्ययावत ७/१२ उतारा ही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. .Cotton Market : कापसाचे उत्पादन घटूनही भाव दबावात का?.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी स्लॉट बुक करून मिळालेल्या तारखेला खरेदी केंद्रावर कापूस न्यावा लागेल. किमान आधारभूत किंमत दराने सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी विहित मुदतीत शेतकऱ्यांनी कपास किसान अॅपद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन परभणी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले पाटील, उपसभापती अजय चव्हाण, सचिव संजय तळणीकर, सर्व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे..Cotton Farming Tips : कापसाची उत्पादकता वाढण्याचा प्राथमिक अंदाज.परभणी-हिंगोली जिल्ह्यात सीसीआयची १३ खरेदी केंद्रकपास किसान अॅप मध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १३ केंद्र दिसत आहेत. त्यात परभणी जिल्ह्यात परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, ताडकळस तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, आखाडा बाळापूर, वसमतनगर, जवळाबाजार हे केंद्र आहेत. दरम्यान, अनेक भागात अद्यापही ई-पीक पाहणी अॅप पाहणी अॅप व्यवस्थित चालत नाही. .तसेच अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साचून राहिलेले आहे. त्यामुळे यंदा लागवड केलेल्या कपाशीच्या पेऱ्याची नोंदणी घेणे शक्य होत नाही. ई-पीक पेरा नोंदणी केल्यानंतर ७/१२ उताऱ्यावर नोंद अद्ययावत होण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागत आहे. यंदाच्या कपाशीच्या पेऱ्यांची नोंद ७/१२ होईपर्यंत शेतकऱ्यांना कपास किसान अॅपद्वारे नोंदणी करणे शक्य नाही. या अॅपद्वारे नोंदणीसाठी मुदत वाढ देण्याची गरज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.