Cotton Production Declining: खानदेशात कापसाच्या दरांवर सातत्याने दबाव कायम असून, बाजारातील अस्थिरता आणि गुलाबी बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आगामी हंगामात कापूस लागवडीत मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कापूस पीक शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस तोट्याचे ठरत आहे. वेचणीचा वाढता खर्च, मजुरांची टंचाई आणि अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. .चालू हंगामाच्या सुरुवातीला नोव्हेंबरमध्ये कापसाचे दर तुलनेने कमी होते. काही काळ दर प्रतिक्विंटल सात हजार रुपयांपर्यंत पोहोचले असले, तरी त्यानंतर पुन्हा घसरण झाली. सध्या दरांमध्ये अस्थिरता कायम असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवडीचे नियोजन स्थगित केले आहे. खानदेशात कापूस लागवडीची तयारी एप्रिल-मे महिन्यात सुरू होते. मात्र यंदा शेतकऱ्यांमध्ये कापूस पिकाबाबत उत्साह दिसून येत नाही..Cotton Bollworm: गुलाबी बोंड अळी नियंत्रणाच्या सोप्या टीप्स; हिरव्या बोंड अळीचे नियंत्रण कसे करावे?.२०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन्ही हंगामांत कापसाचे दर समाधानकारक नव्हते. उत्पादनातही अपेक्षित वाढ झाली नाही. काही शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने मका, गहू, बाजरी आदी पिकांऐवजी फरदड कापूस शेतात कायम ठेवला होता. मात्र, त्यांनाही अपेक्षित दर मिळाले नाहीत. मागील हंगामातही फरदड कापसाला कमी भाव मिळाला होता..Cotton Fertilizer: जमिनीच्या प्रकारानुसार कपाशी पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे?.दुसरीकडे मजुरीचा खर्च वाढला असून, गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे बोंडे व्यवस्थित उमलत नाहीत. परिणामी उत्पादन घटते, कापसाचा दर्जा खालावतो आणि बाजारात मागणीही कमी राहते. फरदड कापसाचे उत्पादन सध्या एकरी अवघे अर्धा क्विंटल मिळत आहे. त्यासाठी वेचणी व इतर खर्च मिळून किमान चार हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे..कापसाचे क्षेत्र सातत्याने घटतेयजळगाव जिल्ह्यात पूर्वी सुमारे ५.८० ते ५.८५ लाख हेक्टरवर कापूस लागवड होत होती. मात्र २०२३-२४ मध्ये हे क्षेत्र ५.६६ लाख हेक्टरवर आले. त्यानंतर २०२४-२५ मध्ये लागवडीत मोठी घट होऊन क्षेत्र ५.११ लाख हेक्टरपर्यंत खाली आले. मागील हंगामात तर कापूस क्षेत्र पावणेपाच लाख हेक्टरच्या आसपास राहिले. कापूस लागवडीतील ही सातत्यपूर्ण घसरण लक्षात घेता यंदा क्षेत्रात आणखी मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.