Parbhani News: यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टी व पुरामुळे परभणी जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ४८३ हेक्टरवरील (९७.७९ टक्के) कपाशीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गोदावरी नदी व उपनद्यांच्या बॅकवॉटरमध्ये बुडल्यामुळे कपाशीच्या अकाली पऱ्हाट्या झाल्या असून वाती एवढासुद्धा कापूस मिळणार नाही. उरल्यासुरल्या कपाशीच्या फुटलेल्या बोंडातील कापूस भिजल्यामुळे धागा कमकुवत झाला आहे..परभणीतील गोदावरी, दूधना, पूर्णा नद्यांच्या खोऱ्यात कपाशीचे दर्जेदार उत्पादन मिळते. जिल्ह्यात २०१९ ते २०२४ या वर्षातील कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार ९५४ हेक्टर आहे. हेक्टरी ३ क्विंटल ५७ किलो (रुई) उत्पादकतेनुसार एकूण ६८ हजार ६०२ टन उत्पादन मिळाले..Crop Damage : पैठण तालुक्यातील ५४ हजार ९८ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान.२०२४ मध्ये कपाशीची १ लाख ९७ हजार हेक्टरवर लागवड असताना हेक्टरी सरासरी ४ क्विंटल २७ किलो (रुई) उत्पादकेतनुसार एकूण ८४ हजार ५४० टन उत्पादन मिळाले होते. यंदा १ लाख ९४ हजार ७८६ हेक्टर लागवड झाली आहे. परंतु अतिवृष्टीमुळे ९७.७९ टक्के क्षेत्रावरील नुकसान झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे..जुलै ते सप्टेंबरमधील अतिवृष्टिमुळे पिकांत पाणी साचून बोंडे सड झाली. पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील पीक कुजून गेले असून शेतकऱ्यांना पऱ्हाट्या उपटण्याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे..Crop Damage : जुन्नरमध्ये द्राक्ष बागांचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान.परभणी जिल्हा अतिवृष्टी, पूर कपाशी नुकसान स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका लागवड क्षेत्र नुकसान क्षेत्रपरभणी ३०७३३ ३०७३३जिंतूर २८९९५ २८२६६सेलू ३१०९७ ३००६०मानवत २३५१९ २२६१०.पाथरी १६५१३ १५९४८सोनपेठ १६०५५ १६०५५गंगाखेड २३६७२ २३०११पालम १६९६५ १६५६३पूर्णा ७२३७ ७२३७.कपाशीच्या उत्पादकेत घट येणार असून पावसात भिजल्यामुळे फुटलेल्या बोंडातील कापूस पिवळा पडतो. कापसाच्या धाग्याच्या मजबुतीवर परिणाम होतो. त्यामुळे क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये कमी दर मिळून नुकसान होते.डॉ. अरविंद पंडागळे, कृषिविद्यावेत्ता वनामकृवि, कापूस संशोधन केंद्र, नांदेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.