Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामात बोंडसड, कपाशीचे बोंडे गळून जात होते. हा प्रकार सदोष बियाणांमुळे झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यानंतर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने तक्रारदार शेतकऱ्यांच्या संबंधित कापसाच्या पिकांची पाहणी करून अहवाल दिला. त्यात कापसाच्या बोंडाची सड, बोंड गळती ही सदोष बियाण्यांमुळे नाही तर नैसर्गिक व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे झाल्याचा अहवाल दिला असून शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली काढल्या आहेत..अहिल्यानगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्राच्या जवळपास कापसाची लागवड केली जाते. यंदा सततचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे अनेक भागात खरीप हंगाम पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच राहुरी, नेवासा, संगमनेर या तालुक्यातील १०० हून अधिक शेतकऱ्यांनी कापूस उत्पादक कंपन्यांकडून सदोष बियाणे विक्री केले असल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली होती. बोंडसड, कपाशीचे बोंडे गळून जाणे यांचा समावेश होता..Cotton Crop Disease: लाखेगाव, अलीपुरातील कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा फटका.कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने आधी पाणी करून नंतर पुन्हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसह तक्रारदार शेतकऱ्याच्या कापसाच्या पिकांची पाहणी केली. या पाहणीत कृषी विभाग आणि विद्यापीठातील शास्त्रांच्या माहितीनुसार, यंदा कपाशी पिकाच्या काही ठरावीक वाणांवर वेगवेगळ्या व्हायरसचा अधिक प्रार्दुभाव होता..Cotton Crop Disease : कापूस पिकावरील दहिया रोगाचे नियंत्रण.त्या संबंधित कंपनीचे कपाशी वाण हे व्हायरसला मोठ्या प्रमाणात बळी पडले. यामुळे त्या वाणाच्या कपाशीत बोंडसड, कपाशीचे बोंडे गळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बाबतचा तपासणी अहवाल शास्त्रज्ञांनी कृषी विभागाला व तक्रार असणाऱ्या संबंधित १०० हुन अधिक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे..अतिवृष्टीचा कापसाला मोठा फटकाअहिल्यानगर जिल्ह्यात मागील पावसाळ्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळे २ लाख हेक्टरवरील पिकांना कपाशी पिकाला फटका बसलेला आहे. यात जून महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, जुलैपासून ते वाढण्यास सुरुवात झाली. यात जुलैमध्ये ८ हेक्टर, ऑगस्टमध्ये ३१.२६ हेक्टर, सप्टेंबरमध्ये १ लाख ७१ हजार हेक्टरवरील कपाशीच्या पिकांना फटका बसलेला आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी निघाल्याचे शेतकरी सांगत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.