Khandesh Farming: खानदेशात यंदा कापूस उत्पादनात घट झाल्याने कापूस प्रक्रिया उद्योगांनाही फटका बसण्याची चिन्हे आहेत. सध्याच्या स्थितीनुसार सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत खानदेशात सुमारे १८ लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..यंदा ऑक्टोबरपूर्वी आणि त्यानंतरही सुरू राहिलेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले. परिणामी उत्पादन घटले असून, प्रक्रिया उद्योगांना अपेक्षित प्रमाणात कापूस उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुई उत्पादनाचे उद्दिष्ट गाठणे कठीण होणार असल्याचे उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे..Cotton Production: खानदेशात १५ लाख कापूसगाठींचे उत्पादन .खानदेशात दरवर्षी साधारणपणे २२ ते २४ लाख कापूसगाठींचे उत्पादन होते. मात्र मागील काही वर्षांपासून कापूस उत्पादनात सातत्याने घट होत आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात कापूस लागवड क्षेत्र कमी होणे, रोगराई आणि प्रतिकूल हवामान यामुळे उत्पादकतेवर परिणाम झाला आहे..Cotton Production: खानदेशात १५ लाख कापूसगाठींचे उत्पादन .दिवाळीनंतरच्या काळात खानदेशातील कापूस प्रक्रिया उद्योग वेगाने कार्यरत असतात. मात्र यंदा कच्च्या मालाचा पुरवठा कमी असल्याने बहुतांश जिनिंग आणि प्रेसिंग उद्योग संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे..सध्या खानदेशात प्रतिदिन सुमारे दीड हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. मागील हंगामात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत प्रतिदिन सरासरी १८ हजार क्विंटल आवक झाली होती. यंदा मात्र महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासूनच आवकेत घट दिसून येत आहे..दिवाळी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही काही काळ कारखाने संथ गतीने सुरू होते. खेडा खरेदीही मर्यादित प्रमाणात सुरू आहे. कारण बहुतांश शेतकऱ्यांकडे आता कापसाचा साठा उरलेला नाही. अनेक शेतकऱ्यांनी कापूस काढणीनंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार हरभरा, गहू आणि मका यांसारख्या पिकांची लागवड केली आहे.अनेक गावांमध्ये जानेवारीतच कापूस वेचणी पूर्ण झाली होती. कोरडवाहू भागात डिसेंबरमध्ये वेचणी वेगात झाली, मात्र उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे स्पष्ट होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.