Akola News: अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सध्या कापसाची लक्षणीय आवक वाढली असून दररोज १० ते १२ हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस बाजारात दाखल होत आहे. दरम्यान, सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदीची मुदत २८ फेब्रुवारीला संपत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आतापासूनच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे..पश्चिम विदर्भातील अकोट ही कापसाची प्रमुख बाजारपेठ मानली जाते. यावर्षी सीसीआयने खरेदी सुरू केल्यापासून बाजारात मोठी उलाढाल होत असून शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार मिळत आहे. मात्र, फेब्रुवारी अखेर यंदाच्या खरेदी हंगामाची मुदत संपत असल्याने ही खरेदी प्रक्रिया थांबण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी सावध झाले आहेत. .Cotton Procurement: खासगी कापूस खरेदीच्या दरात घसरण.त्यामुळेही आवक वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. १३) अकोट बाजारात सुमारे १२ हजार १९५ क्विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली. त्या दिवशी कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ८४५ ते ८ हजार रुपयांदरम्यान दर मिळाला..जानेवारी महिन्यात याच बाजारात कापसाचा दर साडेआठ हजार रुपयांवर गेला होता. सध्या दर ८ हजार १०० रुपयांच्या आत आला असून दरातील घसरणसुद्धा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, सीसीआयची खरेदी बंद झाल्यास खुल्या बाजारात दर आणखी घसरण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत..शेतकऱ्यांच्या मते, सीसीआय ही शेतकऱ्यांसाठी आधाराची यंत्रणा असून बाजारभाव स्थिर ठेवण्यास तिची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला संपूर्ण कापूस खरेदी होईपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी पुढे येत आहे. दरम्यान, वाढती आवक आणि अनिश्चित दरस्थितीमुळे शेतकरी संभ्रमावस्थेत असून शासन व सीसीआयने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..Cotton Market: खानदेशात कापूस आवकेत घट.ठळक मुद्देफेब्रुवारीनंतर बाजारभाव हा हमीभावापेक्षा कमी झाला तर काय ?आता वेचणी केलेल्या कापसाला हमीभाव मिळणार नाही का ?बाजारात फेब्रुवारीनंतरही आवक असते व तेव्हा बाजारभाव कमी झाले तर होणाऱ्या नुकसानीचे काय ?.जिल्ह्यात अद्यापही असंख्य शेतकऱ्यांचा कापूस विक्री व्हायचा आहे. शासनाची म्हणजेच सीसीआयची खरेदी जर फेब्रुवारी अखेर बंद झाली तर बाजारातील दर घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचेच नुकसान होईल. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या घरातील शेवटचे बोंड खरेदी करेपर्यंत शासकीय खरेदी बंद करू नये.चंद्रशेखर गवळी, जिल्हाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना, अकोला..या बाजार समितीमध्ये फेब्रुवारी नंतरही मोठया प्रमाणात कापसाची आवक होत असते. दरम्यान आता फेब्रूवारी अखेर सीसीआयची खरेदी बंद झाल्यास कापूस उत्पादकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करणे आवश्यक आहे.अतुल खोटरे, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.