Nashik News : कसमादे परिसरात १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील कळवाडी महसूल मंडलातील १२ गावांमध्ये ४ हजार ३५ हेक्टर क्षेत्रावर मोठे नुकसान समोर आले आहे. .यामध्ये प्रामुख्याने कापूस व मका पिकाचे नुकसान आहे. खरीप हंगामात अपेक्षा असताना या भागातील शेतकरी या नैसर्गिक संकटामुळे कोलमडला आहे. मालेगाव तालुक्यातील कळवाडी महसूल मंडलातील कळवाडी, चिंचगव्हाण, नरडाणे या गावात मोठा फटका आहे. .Rain Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात सलग पावसामुळे शेतीचे नुकसान.याशिवाय उंबरदे, देवघट, साकुर, शेरूळ, हिसवळ, पाडळदे, सायतरपाडे, रोझे गावांचा समावेश आहे. या गावामध्ये ८ हजार २२४ शेतकरी बाधित आहेत. पिकांमध्ये कापूस ३ हजार २०१ तर मका पिकाचे ८३४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे. यासह परिसरात, बाजरी, भुईमूग, खरीप कांदा रोपांचे नुकसान आहे..कळवाडी व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शिवारातून जोरदार पाणी वाहिले. त्यामुळे कापूस लागवडी उन्मळून पडल्या आहेत. याशिवाय मका, ऊस, बाजरी पिके देखील आडवी झाली आहेत. यंदा पावसाने उघडीप दिली. पिके पाण्यावर आली होती. त्यानंतर जोरदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. .Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका.ऐन पोळा सणाच्या तोंडावर अतिवृष्टीसदृश पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अतिवृष्टीसंदर्भात मिळाल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी तत्काळ तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणी करून तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तहसीलदार विशाल सोनवणे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे आदींसह संबंधित अधिकाऱ्यांनी कळवाडी, नरडाने, चिंचगव्हाण, साकूर, दापूरे, देवघट आदी गावांमधील नुकसानीची पाहणी केली. यावेळी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार सोनवणे यांनी क्षेत्रीय यंत्रणेला दिल्या आहेत..मुख्य नुकसानग्रस्त पिकेकापूस - ३,२०१ हेक्टरमका - ८३४ हेक्टरयाशिवाय बाजरी, भुईमूग, खरीप कांदा रोप.कळवाडी व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.- सुहास कांदे, आमदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.