Pune News: राज्यातील साखर उद्योगाची वाढती उलाढाल सुखद असली, तरी दुसऱ्या बाजूला अवसायनात निघणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या चिंता वाढविणारी आहे. आतापर्यंत ५४ कारखाने अवसायानात निघाले असून ही स्थिती सहकारी साखर कारखानदारीसाठी धोक्याची घंटा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे..कधी काळी सहकार चळवळ हाच राज्याच्या साखर उद्योगाचा आत्मा होता. परंतु सद्यःस्थिती उलट आहे. राज्यात आता केवळ १०५ सहकारी तर खासगी कारखान्यांची संख्या ११० पर्यंत पोहोचली आहे. येत्या दोन दशकांत राज्यात सहकारी साखर कारखान्यांची संख्या ५० पेक्षा खाली जाईल, अशी भीती एका सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाने व्यक्त केली. .Sugar Industry Loan: आधी अहवाल द्या; नंतरच कर्ज घ्या!.सहकारात १०५ कारखाने असले तरी त्यातील १६ कारखाने भागीदारी किंवा भाडेतत्वावर देण्यात आलेले आहेत.अवसानात (लिक्विडेशन) काढलेल्या ५४ कारखान्यांपैकी ९ कारखाने भाडेतत्वावर चालविण्यास दिले गेले आहेत. मात्र, उर्वरित ४६ बंद आहेत..साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, साखर कारखान्यांमधील साखर किंवा उपपदार्थांचा उत्पादन खर्च व त्याप्रमाणात मिळणारा नफा याचे गणित बिघडल्यास ताळेबंद विस्कळीत होतो. त्यातून तो कारखाना आर्थिकदृष्ट्या आजारी पडतो. छुपे गैरव्यवहार हेदेखील कारखाने आजारी पडण्यामागचे एक मुख्य कारण आहे. आजारी कारखाने पुढे अवसायानात काढले जातात..आजारी किंवा अवसायानात निघालेल्या साखर कारखान्यांना भागीदारी किंवा भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय राज्य सरकारने २०२० मध्ये घेतला होता. त्यानुसार, सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीदेखील तयार करण्यात आली. सहकारमंत्र्यांच्या या समितीने आतापर्यंत सहा सहकारी साखर कारखाने भाडेतत्वावर; तर तीन सहकारी साखर कारखाने भागीदारी तत्त्वावर चालविण्यास मंजुरी दिलेली आहे. .Sugar Industry Crisis: कारखान्यांची स्पर्धा साखरेच्या मुळावर.कारखाना चालू झाल्यानंतर संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कृषी व ग्रामविकासाला चालना मिळते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. सहकारी साखर कारखाने इतरांना चालविण्यास देण्याचे धोरण पुढेही चालू राहिले. त्यामुळे आतापर्यंत सहा सहकारी कारखाने भाडेतत्वावर, पाच सहकारी कारखाने भागीदारी तत्त्वावर तर दोन सहकारी कारखाने सहयोगी तत्त्वावर असे एकूण १३ कारखाने चालू करण्यास राज्य शासनाला यश आले आहे, असे साखर आयुक्तालयाचे म्हणणे आहे.....असे आहे राज्याच्या साखर उद्योगाचे चित्रएकूण साखर कारखाने २८२बंद कारखान्यांची संख्या ७९चालू कारखाने २०३बहुराज्यीय साखर कारखाने १३सहकारी साखर कारखाने १०५खासगी साखर कारखाने ११०.राज्य व केंद्र सरकारच्या कमकुवत धोरणामुळेच सहकारी साखर कारखान्यांची दुरवस्था झाली आहे. सहा वेळा एफआरपी वाढविणाऱ्या सरकारने साखरेच्या एमएसपीकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. सरकारची सहवीज व इथेनॉलची धोरणंदेखील चुकीचीच ठरली आहेत. शासनाच्या भरवशावर अनेक कारखाने सहवीजेकडे वळाले. मात्र विजेला दर न दिल्याने तोटे वाढले. इथेनॉल धोरण आणल्यावर ४० हजार कोटी रुपये साखर उद्योगाने गुंतविले. मात्र तेथेही फसवणूकच झाली. कारण इथेनॉल निर्मिती व खरेदीवर जाचक अटी लादून साखर उद्योग तोट्याच्या मार्गावर आणून ठेवला. चुकीची सरकारी धोरणं न बदल्यास पुढील काही वर्षांत सहकारी साखर कारखानदारी संपल्याशिवाय राहणार नाही. पी. आर. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ.कोणतीही सहकारी संस्था अवसायनात निघण्यामागे आर्थिक समस्या व प्रशासकीय अनागोंदी अशी दोन प्रमुख कारणे असतात. व्यावसायिक तत्त्व बाजूला ठेवत फक्त राजकीय हेतूने संस्था चालविल्यास ती अंतिमतः अवसानात निघते. थकहमी देत बंद काही साखर कारखान्यांना जीवदान देण्याचे काम राज्य सरकार करते आहे. परंतु, व्यावसायिकदृष्ट्या गुणवत्तापूर्ण कारभाराचा अंगीकार केल्याशिवाय कोणताही कारखाना सक्षमपणे दीर्घकाळ चालू शकत नाही.संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.