Pune News : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यात अनेक ठिकाणी ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. मात्र सध्या सुरू असेल्या मुसळधार पावसामुळे या निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करून त्या ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी दिली. .राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७३ क बमधील तरतुदीनुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून २५ जुलै रोजी शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या सहकारी संस्थांची एकूण संख्या ३,१८८ असून त्यापैकी ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांची संख्या ही २८५ इतकी आहे..India Vice President Election: इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर.राज्यात सोमवारअखेर (ता. १८) ३० जिल्ह्यांत सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून त्यापैकी १५ जिल्ह्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतील शेतकरी खरीप हंगामातील शेतीविषयक कामात व्यग्र आहेत..APMC Election : बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू .अशा शेतकऱ्यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत स्थगित केली आहे..महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क कमधील तरतुदीनुसार पावसाळ्याच्या हंगामात सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याबाबत शासनास अधिकार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पावसाची सद्यःस्थिती विचारात घेऊन ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.