Cooperation Agreement : हाइफा ग्रुप सोबत महाधन ॲग्रीटेकचा सहयोग करार

Agreement Update : इस्राईलमधील स्‍पेशालिटी प्‍लांट न्‍यूट्रिएण्‍ट्समधील आघाडीची व आंतरराष्ट्रीय कंपनी ‘हाइफा ग्रुप’ आणि महाधन ॲग्रीटेक लि. (एमएएल) यांनी एक सहयोग करार केला आहे.
Cooperation Agreement
Cooperation AgreementAgrowon

Pune News : इस्राईलमधील स्‍पेशालिटी प्‍लांट न्‍यूट्रिएण्‍ट्समधील आघाडीची व आंतरराष्ट्रीय कंपनी ‘हाइफा ग्रुप’ आणि महाधन ॲग्रीटेक लि. (एमएएल) यांनी एक सहयोग करार केला आहे.

या सहयोगांतर्गत त्यांची उच्‍च कार्यक्षम खते स्‍मार्टकेम टेक्‍नॉलॉजीज लि. (एसटीएल) व दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्‍स कॉर्पोरेट लि. (डीएफपीसीएल) यांची उपकंपनी महाधन भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करेल.

Cooperation Agreement
Water Agreement : कर्नाटकचे पाणी जतला देऊ पण... ; डी. के. शिवकुमारांची महाराष्ट्रासोबत कराराची तयारी

आज ६ दशलक्ष हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर ठिबक सिंचन वापरले जाते. त्यात घेतल्या जाणाऱ्या फळे, भाज्‍या, ऊस अशा अनेक पिकांसाठी संतुलित वैशिष्ट्यपूर्ण अशी विद्राव्य खते उपलब्ध होण्यासाठी ‘हाइफा ग्रुप’ सोबतचा हा सहयोग एक महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे.

Cooperation Agreement
Energy Generation Agreement : राज्यात ५ हजार २२० मेगावॉट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार

ही खते पिकांद्वारे शोषली जाऊन भूजल व वायू प्रदूषण कमी होण्‍यास मदत होईल, असा दावा ‘डीएफपीसीएल’ चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शैलेश सी. मेहता यांनी केला.

या वेळी बोलताना इस्राईलमधील ‘हाइफा ग्रुप’चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मॉटी लेविन म्‍हणाले, की आम्‍ही भारतीय शेतकऱ्यांना साह्य करण्‍यासाठी महाधन अॅग्रीटेकसोबत करार केला आहे. आमचे जागतिक कौशल्‍य व संसाधने आणि ‘एमएएल’च्‍या स्थानिक पातळीवरील कौशल्‍ये यांची सांगड घालणार आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com