Junnar APMC: खासगी जागा खरेदी प्रकरण आरोप प्रत्यारोपांनी गाजले
Farmers Protest: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ कोटी रुपयांच्या जमीन खरेदी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.९) मोर्चा काढत या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला, तर संध्याकाळी या जागेवर पालेभाज्या लिलावाचा प्रारंभ झाला.