Fruit Vegetable Storage: साठवणीतील वातावरण,प्रकाश संरचना महत्त्वाची
Storage Technology: फळे आणि भाज्यांचा साठवण कालावधी वाढवण्यासाठी साठवणगृहातील तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि वातावरणाची रचना यासोबतच प्रकाश व्यवस्थाही अत्यंत महत्त्वाची ठरते. काढणीनंतरही फळे व भाज्यांचे श्वसन सुरू असल्याने ऑक्सिजन, CO₂, नायट्रोजन आणि इथिलीन यांच्या प्रमाणात बदल करून नियंत्रित वातावरण तयार केल्यास त्यांची गुणवत्ता अधिक काळ टिकवता येते.