Black Thrips in Chili Crops: प्रथम २०१५ मध्ये प्रथम पपई पिकावर आढळलेली ‘थ्रिप्स पार्विस्पिनस’ ही नवीन व अधिक आक्रमक प्रजाती अलीकडे मिरची पिकावरही पसरली आहे. या किडीचा प्रादुर्भाव ओळखणे कठीण असून, ती इतर फुलकिड्यांच्या तुलनेत जलद प्रजननक्षम आणि बदलत्या हवामानाशी अधिक अनुकूलनक्षम आहे. तीनही प्रजातींमध्ये साम्य भरपूर असून, बदल फारच असल्यामुळे या किडीची अचूक ओळख करणे अवघड ठरते. या किडीची ओळख पटवून नियंत्रणाच्या उपाययोजना वेळीच न केल्यास मिरची उत्पादनामध्ये ५० ते ९० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. .एकात्मिक व्यवस्थापनउन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीत लपलेल्या कीड अवस्थांचा नाश करावा.रोपे तयार करण्यापूर्वी बियाण्यांवर इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.एस.) १० ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे प्रक्रिया करावी.मिरची लागवड केलेल्या क्षेत्रात पुन्हा पुन्हा त्याच पिकाची लागवड न करता पिकांची फेरपालट करावी..प्रति हेक्टर ५०० किलो नीमपेंड आणि एक टन गांडूळ खत जमिनीत मिसळून वापरावे.लागवडीवेळी २५ ते ३० मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक आच्छादन (मल्च) वापरल्यास फुलकिडीच्या संख्येमध्ये घट दिसून आली आहे.लागवड वेळेवर व शिफारशीनुसार अंतर राखून करावी.मिरचीबरोबर अधिक मका किंवा ज्वारी आणि चवळी यांचे १०:३:१ या प्रमाणात मिश्र पीक घ्यावे. यामुळे उंच पिकांचा पट्टा तयार होऊन थ्रिप्स किडीचा शेतात प्रवेश कमी होतो. चवळीमुळे किडीचे नैसर्गिक भक्षक वाढून नैसर्गिक नियंत्रणास मदत होते..Chilli Disease: मिरचीवरील ब्लॅक थ्रिप्स.जास्त दाट लागवड टाळावी.लागवडीसाठी कीडमुक्त रोपे निवडावीत.शेत व बांधावरील गाजर गवत, घाणेरी यांसारखे पर्यायी खाद्य तणे उपटून नष्ट करावेत.शिफारशीनुसार संतुलित खतांचा वापर करावा. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.पाणी देण्यासाठी पाटपाणी ऐवजी स्प्रिंकलर पद्धत वापरावी, कारण स्प्रिंकलरमधील पाण्याचा फवारा थ्रिप्सची वाढ आणि संख्या कमी करतो..पिकाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालाश खताची मात्राही द्यावी.पिकाच्या पानांच्या उंचीवर निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे चिकट सापळे हेक्टरी ६० ते ७५ लावावेत.मिनीत स्टायनर्नीमा कार्पोकॅप्से किंवा हेटेरोरॅब्डिटिस इंडिका हे उपयुक्त परजीवी सूत्रकृमी ७.५ ते १२.५ किलो प्रति ५०० ते ७५० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.अतिप्रादुर्भाव झालेली झाडे उपटून जाळून नष्ट करावीत.पिकामध्ये थ्रिप्स प्रती प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी कॅपाफायकस अल्वारेझी या समुद्री गवताच्या अर्काची २ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी..किडीचा प्रार्दुभाव आढळून येताच, प्रथम निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडुनिंबयुक्त कीटकनाशक अॅझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ मि.लि. किंवा करंज तेल ०.५ टक्का ५ मि.लि. किंवा निरगुडी अर्क ५० ते ८० मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.वातावरणामध्ये पुरेशी आर्द्रता असल्यास बिव्हेरिया बॅसियाना किंवा लेकेनिसिलिअम लेकॅनी (४ ग्रॅम किंवा मिलि प्रति लिटर पाणी (१x१० चा ८ वा घात सीएफयू) या जैविक कीटकनाशकाची सायंकाळी फवारणी करावी..Chilly Crop Disease : 'असा आहे' मिरचीच्या पिकातील ‘पानावरील ठिपका रोग’.रासायनिक नियंत्रणफवारणी करताना संपूर्ण झाडावर कीटकनाशक नीटपणे पोहोचेल याची काळजी घ्यावी. नोंदणीकृत नसलेले कीटकनाशक, वनस्पती वाढ नियामक, आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे टाळावे. एकाच गटातील कीटकनाशक वारंवार वापरणे टाळावे. शिफारशीत कीटकनाशक शिफारशीच्या मात्रेतच वापरावे. कमी किंवा जास्त प्रमाणात वापरल्यास कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढू शकते किंवा त्यांचे पुनरुज्जीवन होऊ शकते..शिफारशीत कीटकनाशके : (प्रमाण प्रति लिटर पाणी)इथिऑन (५० टक्के ई.सी.) ३ मि.लि. किंवासायॲन्ट्रानिलिप्रॉल (१०.२६ टक्के ओ.डी.) १.२ मि.लि. किंवाफिप्रोनिल (८० टक्के डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम किंवास्पिनोसॅड (४५ टक्के एस.सी.) ०.३२ मि.लि. किंवास्पायरोटेट्रामॅट (१५.३१ टक्के ओ.डी.) ०.८ मि.लि. किंवाटॉलफेनपायरॅड (१५ टक्के ई.सी.) २ मि.लि. किंवा.इमामेक्टिन बेंझोएट (१.५० टक्का) अधिक फिप्रोनिल (३.५० टक्के एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) १ ग्रॅम किंवाइमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के) अधिक ल्यूफेनुरॉन (४० टक्के डब्ल्यू.जी.) (संयुक्त कीटकनाशक) ०.१२ ग्रॅम किंवाफ्लुबेंडायअमाइड (१९.९२ टक्के) अधिक थायाक्लोप्रिड (१९.९२ टक्के एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) ०.४ मि.लि.(सर्व कीटकनाशकांना ॲड हॉक लेबल क्लेम आहेत.)- रवींद्र पालकर, ८८८८४०६५२२(पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.