Contractor Dues Issue Maharashtra : महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न चिघळत चालला असून शासनाच्या आर्थिक धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने सादर केलेल्या आकडेवारी आणि प्रत्यक्षातील आर्थिक परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना केला..या पार्श्वभूमीवर ९ मार्च रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांकडे कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची देयके अनेक महिन्यांपासून रखडलेली आहेत. मार्च २०२५ अखेर सुमारे ८९ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित होती. मार्च २०२६ पर्यंतही सुमारे ७७ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी कायम असल्याचे सांगण्यात आले आहे..Paddy Payment Delay: गोंदियात धान चुकाऱ्यांची रखडपट्टी.गेल्या १४ महिन्यांत केवळ ११ हजार कोटी रुपये वितरित झाले असून ही रक्कम एकूण थकबाकीच्या केवळ १२ टक्के इतकी आहे. त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक गळचेपी होत असून मानसिक तणावही वाढत असल्याचे भोसले यांनी सांगितले. प्रचंड थकबाकीमुळे गेल्या दीड वर्षापासून नवीन कामांना मंजुरी मिळालेली नाही..विविध विभागांकडील लेखाशिर्षकांना निधी उपलब्ध नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. सुरू असलेली अनेक कामे निधीअभावी अर्धवट अवस्थेत पडून आहेत. रोजगार, बाजारातील उलाढाल आणि स्थानिक अर्थचक्र यावरही याचा गंभीर परिणाम होत आहे. अशी परिस्थिती राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीच निर्माण झाली नव्हती, असा दावा कंत्राटदार संघटनांनी केला आहे..NAFED Payment Delay: आमच्यावर आता ‘संक्रांत’ आणणार का? .या सर्व पार्श्वभूमीवर शासनाच्या धोरणाविरोधात पुढील भूमिका ठरविण्यासाठी आणि कंत्राटदारांच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना तसेच महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यांची संयुक्त राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे..या बैठकीस राज्यातील सर्व विभागांतील कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून पुढील आंदोलनाची दिशा या वेळी ठरविण्यात येणार असल्याचे राजाध्यक्ष अभियंता मिलिंद भोसले, महासचिव सुनील नगराळे, अभियंता संघटना महासचिव राजेश देशमुख आणि कार्याध्यक्ष संजय मैंद यांनी कळविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.