Nashik News : जिल्हा वार्षिक योजनेत राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्याकरिता ३२१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा नियोजन शाखेकडून प्राधान्याच्या विकासकामांवर हा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. पण, प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी या निधीत ठेकेदारांनी सुचविलेल्या कामांचा अंतर्भाव केल्याच्या तक्रारी असून, लोकप्रतिनिधींनी त्याबाबत आवाज उठविला. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. \.राज्यस्तरावरून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत चालू वर्षी सर्वसाधारण उपयोजनांसाठी ९२५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ऑगस्ट उजाडला तरी शासनस्तरावरून एक रुपयाही मिळालेला नव्हता. त्यातही आठ महिन्यांपासून पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसली..Development Fund Crisis: आमदारांना निधी मिळेना! ९ महिन्यांपासून राज्यात विकासकामे ठप्प.निधीअभावी कामे रखडल्याने लोकप्रतिनिधींनाही मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. शेवटी गेल्या आठवड्यात शासनाने जिल्ह्याच्या सर्वसाधारण आराखड्यातून पहिल्या टप्प्यात ३० टक्क्यांचा निधी उपलब्धकरून दिला. या निधीतून आरोग्य व अन्य प्राधान्याची कामे हाती घ्यावीत, अशी शासनाच्या सूचना आहेत..त्यानुसार नियोजन शाखेने निधी वितरणाचे नियोजन करणे अपेक्षित होते. पण, ठेकेदारांनी नियोजनच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरत आमदारांनी न सुचविलेली कामेही आराखड्यात समाविष्ट केल्याचे समोर आले आहे. शासनाकडून चालू वर्षी पाच महिने विलंबाने निधी उपलब्ध करून दिला. .Akola Development Fund : ‘नियोजन’च्या ३७४ कोटींच्या खर्चाला मंजुरी.त्यातही केवळ ३० टक्केच निधी प्राप्त झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता लागू होणार असल्याने उपलब्ध निधीचे तातडीने नियोजन करणे अपेक्षित होते; परंतु ठेकेदारांच्या मर्जीतील कामांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत तक्रार केली. त्यामुळे नियोजन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे..ठेकेदारांच्या चकरा वाढल्यापाच महिन्यांपासून निधी नसल्याने जिल्हा नियोजन शाखेत शुकशुकाट होता. मात्र, शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यावर ठेकेदारांच्या विभागातील चकरा वाढल्या आहेत. दरम्यानच्या काळात तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांची पंधरवड्यापूर्वीच पदोन्नतीवर छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. त्यामुळे सध्या या पदाचा प्रभारी कारभार सहायक अधिकाऱ्यांवर आहे. हीच संधी साधत ठेकेदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याची चर्चा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.