Pune News : मागील दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा कहर सुरू आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी आठपर्यंत मावळ तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दौंड तालुक्यासह इतर काही ठिकाणी सततच्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली असून, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे..सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याची निचरा व्यवस्था कोलमडल्याने काही भागांत शेतजमीन चिखलात बुडाली आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांवर झाला आहे. पश्चिमेकडील तालुक्यांत भातशेती पूर्णतः पाण्याखाली गेली असून, काही ठिकाणी रोपे कुजण्यास सुरुवात झाली आहे. .Pune Heavy Rain: पावसाचा जिल्ह्यात २७३ हेक्टरला फटका.दौंड भागातही सोयाबीन पीक सततच्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे पीक सडले असून, बाजारात पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे..Soybean Crop Damage: सोयाबीन शेतातच अंकुरले! .शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव, भोर या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बाजरी पिकाच्या काढणीची लगबग वेगात सुरू आहे. मात्र, दौंड, इंदापूर, पुरंदर, बारामती भागांत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनाम्याची वारंवार मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे..आमच्या शेतात भाताचे पीक जोमात होते, पण गेल्या तीन दिवसांच्या पावसामुळे सगळे पाणीच पिकात साचले. आता पीक सडतेय. सरकारने लवकर मदत करावी.रोहिदास लखिमले, शेतकरी, मावळ.मंडल पडलेला पाऊस (मिमीमध्ये)तळेगाव ३०कार्ला ३०टाकवे खु. ३२खडकावळ ३५लोणावळा ३०वाडेश्वर, कुसगाव ३०देऊळगाव, रावणगाव, दौंड, कुरकुंभ - ३१मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडलेली मंडले : (स्रोत ः कृषी विभाग).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.