Jalna News: सातत्याने झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे द्राक्ष काडीची परिपक्वता, गर्भधारणा न होणे, डोळा उघडण्यात विलंब यासह निर्माण झालेल्या समस्यांमुळे कडवंची व परिसरातील द्राक्षाचे आगारात ‘जर-तर’च्या फेऱ्यात अडकल्यासारखी स्थिती आहे..जालना जिल्ह्यातील कडवंचीसह नंदापूर, धारकल्याण, पिरकल्याण, बोरखेडीसह परिसरातील ८ ते १० गावांमध्ये द्राक्षाचे क्षेत्र विस्तारले आहे. मात्र मागील तीन-चार वर्षांत उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ न बसल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष क्षेत्र घटले आहे. नैसर्गिक आपत्तीसह कृत्रिम संकटाचा फेरा पिच्छा सोडत नसल्याने नव्याने द्राक्ष लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे..गेल्या अनेक वर्षांपासून सातत्य ठेवून असलेल्या शेतकऱ्यांनी मात्र काही प्रमाणात गतवर्षीपासून क्षेत्र वाढ करण्याला सुरुवात केल्याची स्थिती आहे. आताच्या घडीला द्राक्ष आगारात ऑक्टोबर छाटणीच्या कामांना द्राक्ष उत्पादकांनी गती दिली असून शेकडो मजुरांच्या हाताला यामुळे काम मिळाले आहे..Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ.एप्रिल छाटणीनंतर पावसाचे आक्रमणनंदापूरचे द्राक्ष उत्पादक दत्तात्रय चव्हाण म्हणाले, की एप्रिल छाटणीनंतरचा कालावधी झाडांच्या गर्भधारणेचा काळ असतो. या काळात स्वच्छ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. परंतु मे महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने द्राक्ष बागातील पानांची कार्यक्षमता घटली. त्याचा नेमका काय परिणाम झाला हे आता ऑक्टोबर छाटणीनंतर त्या पुढील पंधरवड्यात कळून येईल. शिवाय उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षीचा हंगाम वगळता आधीचे तीन-चार वर्षे नुकसानच सोसावे लागले. त्यामुळे आता द्राक्ष उत्पादकांची खर्च करण्याची मानसिकता उरली नाही..‘वेदर स्टेशन’चा सावळा गोंधळकडवंची येथील संदीप क्षीरसागर म्हणाले, की कडवंची शिवार वाघरूळ जहांगीर येथील ‘स्कायमेट वेदर स्टेशन’च्या अंतर्गत येते. या वेदर स्टेशनमधून अपेक्षित अचूक माहिती न मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्यात खोडा घातला गेला आहे. धो धो पाऊस पडला तरी स्कायमेट वेदर स्टेशन पाऊसच दाखवत नाही. १७ सप्टेंबरला याचा पंचनामा झाला. त्या वेळी रेनगेजमध्ये माती पाणी आढळून आले. शिवाय यासाठीचे संरक्षक तारकुंपण विस्कळीत झाल्याचे दिसून आले. याआधी जवळपास तीन वेळा असाच प्रकार समोर आला होता. पण शेतकऱ्यांच्या नुकसानीशी खेळणाऱ्या या बाबीकडे प्रशासन गंभीरतेने बघायला तयार नाही..Farmer Issue: अतिवृष्टिबाधित तालुक्यांच्या यादीत गोंधळ; शेतकऱ्यांमध्ये संताप.गेल्या वर्षीचा विमा परतावा अजून नाहीसंदीप क्षीरसागर म्हणाले, की ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात विमा उतरविण्याची संधी असते. १६ ऑक्टोबर ते ३० एप्रिल पर्यंतचा कालावधी विमा संरक्षणात महत्त्वाचा असतो. या काळात तीन टप्प्यांत पाऊस, कमी पाऊस, जास्त पाऊस, तापमानातील चढ-उतार, या बाबी द्राक्ष उत्पादकांना विमा भरपाई मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यंदा अपेक्षीत क्षेत्र असूनही विमा पोर्टलवर आमचा शिवार द्राक्ष पिक विमा उतरविण्यासाठी दिसत नव्हता. तालुका, जिल्हास्तरापर्यंतच्या कृषी यंत्रणांना याबाबत माहिती देऊनही काही उपयोग झाला नाही. .कृषी आयुक्तांच्या कानावर ही बाब गेल्यानंतर पुढे हालचाल होऊन ७ ऑक्टोबरपासून आमच्या परिसरातील पीक विम्यासाठी पोर्टलवर दिसू लागलं. तिथून पुढे विमा उतरवणं सुरू केलं त्यात आठवडा गेला.गेल्या वर्षीचा विमा परतावा अजून मिळाला नाही. पुढेही मिळेल की नाही कळायला मार्ग नाही. आम्ही आधीच संकटात असताना, यंत्रणाचा हा हलगर्जी नाही तर काय म्हणावं. .अति पावसाने काडीची पानं करपली. पाण्यामुळे मुळी चोकअप झाली. घड कमी निघत आहेत. जिथे ४५ बंच हवे तिथे १० ते १५ बंच दिसत आहेत. अति पावसाने काडीची परिपक्वताही झाली नाही.विक्रम क्षीरसागर द्राक्ष उत्पादक, कडवंची, जि. जालना.पावसामुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या छाटण्या लांबणीवर पडल्या. आता कमी वेळेत सर्व छाटण्यावर कराव्या लागतील. त्यामुळे एकाच वेळी बाजारात उत्पादन येण्याचा धोका आहे. छाटणीनंतर पंधरवड्याने आणखी किती समस्या येतील याचा अंदाज नाही.चंद्रकांत क्षीरसागर द्राक्ष उत्पादक कडवंची, जि. जालना.काडीची परिपक्वता व्यवस्थित झाली नाही. फूट पिवळी निघत आहे, ती हिरवी निघायला हवी. झाडामध्ये अतिरिक्त पावसामुळे अन्नद्रव्याचा पुरेसा साठा झाला नाही. काडीमध्ये गर्भधारणा व्यवस्थित झाली नाही. करपा आला. अशा द्राक्षातील समस्या वाढतच चालल्या आहेत.राम क्षीरसागर द्राक्ष बागायतदार कडवंची, जि. जालना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.