Maharashtra Monsoon News : नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत झालेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सरासरी ३५.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. . मुदखेड तालुक्यातील मुदखेड (८०.५० मिमी) व मुगट (९२.५० मिमी) तसेच किनवट तालुक्यातील उमरी बाजार (६६.०० मिमी) या तीन महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली..Vidarbha Rain: पश्चिम विदर्भात दिलासादायक पावसाची हजेरी.जिल्ह्यात सर्वाधिक ७५.७० मिमी पाऊस मुदखेड तालुक्यात झाला. त्यापाठोपाठ हिमायतनगरमध्ये ४७.६० मिमी, किनवटमध्ये ५०.२० मिमी, अर्धापूरमध्ये ४७.३० मिमी, माहूरमध्ये ४५.३० मिमी, उमरीमध्ये ४३.८० मिमी, नांदेडमध्ये ४०.८० मिमी आणि भोकरमध्ये ३८.५० मिमी पावसाची नोंद झाली. .Rain Deficit: पावसाअभावी अमरावतीतील सहा लाख हेक्टरवरील खरीप संकटात.देगलूरमध्ये ३२.६० मिमी, हदगावमध्ये ३२.४० मिमी, धर्माबादमध्ये ३२.३० मिमी, नायगावमध्ये २९.३० मिमी, मुखेडमध्ये २३.१० मिमी, बिलोलीमध्ये २२.१० मिमी, लोहामध्ये २१.२० मिमी, तर कंधारमध्ये १८.६० मिमी पाऊस झाला..या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी खरीप पिकांना चांगला फायदा होणार असून, मागील काही दिवसांपासून जाणवत असलेला पावसाचा खंड भरून निघण्यास मदत झाली आहे. अनेक भागांत शेततळी, ओढे-नाले आणि इतर लहान जलस्रोतांमध्येही पाण्याची आवक वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.