Nashik News : दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नगदी पीक असलेल्या टोमॅटोची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उडीद, भुईमूग, सोयाबिन, मका या पिकांची पेरणी केलेली आहे. परंतु सततच्या रिमझिम पावसाने औषधांची फवारणी करणे अवघड झाल्याने पिकांवर पिवळेपणा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. .सततच्या पावसाने जमिनीची तहान पूर्ण होऊन जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण थांबल्याने जमिनी उफाळली आहे. पिकांसाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश जवळपास पिकांना न मिळाल्याने सोयाबीन, भुईमूग, मका अशा पिकांची जमिनीतील अन्नघटक मिळण्याची प्रक्रिया थांबून पिवळे पडू लागले आहेत. .Tomato Crop Disease: टोमॅटो पिकातील खोडकुज रोगाचे व्यवस्थापन.टोमॅटो पीक सुद्धा फुलकळी लागून फळ भरण्याच्या अवस्थेत आहेत. परंतु सततच्या पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर आता मर, करपा, डावनी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. टोमॅटो लागवडीनंतर द्यावयाची खते व आवश्यक फवारणी सततच्या पावसामुळे वेळीच होऊ शकलेली नाही. .Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण.ज्यांनी खते व फवारण्या केल्या, त्या सततच्या पावसाने धुवून गेल्याने, त्याचा पिकाला कोणताच फायदा झाला नाही. पिकातून सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे मुळांची जमिनीतील अन्न घटक शोषून घेण्याची क्षमता थांबली आहे, त्याचाही पिकावर परिणाम होत असल्याने पिकांची खर्चानुसार अपेक्षित जोमदार वाढ आणि फुटवा न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊन आर्थिक उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे..पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे अतोनात नुकसान झाले आहे. टोमॅटोवर सध्या मर, करपा रोगांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातच टॉमेटोच्या बाजारभावात घसरण झाली असून सध्याच्या परिस्थिती खूपच अवघड झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग दुहेरी संकटात आहे.-तुषार घुले, टोमॅटो उत्पादक शेतकरी, मावडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.