Kolhapur News : दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसाने खरीप हंगामात काढणीला आलेले सोयाबीन, भुईमूग पीक धोक्यात आले आहे. रविवारी सकाळी आठपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांत हातकणंगलेत सर्वाधिक ३७ मिमी पाऊस झाला. .शिरोळमध्ये २६.५, पन्हाळयात ३४, शाहूवाडीत ३६, राधानगरीत २२.५ गगनबावड्यात १७.९, करवीरमध्ये ३०.७, कागलमध्ये २२, गडहिंग्लजमध्ये १०.३, भुदरगडमध्ये १४.१, आजरामध्ये ९.८, चंदगडमध्ये ८ मिमी पावसाची नोंद झाली..Crop Damage Compensation : केंद्र सरकारकडूनही मिळणार मदत ः बावनकुळे.पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, भुईमूग यांना प्रामुख्याने फटका बसत आहे. दसऱ्यानंतर भात व सोयाबीनची कापणी सुरू होते. ऐन दसऱ्याच्या तोंडावर अधिक उत्पादनाची आशा धरलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांची परतीचा पाऊस दाणादाण करीत असून उत्पादनात घट येणार आहे. .Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान.यंदाच्या हंगामात जिल्ह्यात लवकर सुरू झालेला पाऊस, रोग, किडींचा प्रादुर्भाव यामुळे बरेच क्षेत्र बाधित झाले आहे. भाताच्या नवीन जातींना व फुलोऱ्याला अधिकचा पाऊस मारक ठरत आहे. अधिक पावसामुळे फुलोऱ्यात असणाऱ्या भात जातींना फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. .सखल भागातील रोपवाटिका व भाजीपाला उत्पादकांना अधिक पावसाचा फटका बसत आहे. पाणी साचून राहिल्यामुळे रोपे कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. झेंडूचेही नुकसान होत आहे. पावसाने फक्त उसाची वाढ चांगली होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.