Solapur News : सततच्या पावसामुळे बागांत साचलेले पाणी व त्यामुळे वाफशाच्या अभावामुळे यंदा द्राक्षबागांची छाटणी १० ते १५ दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पाऊस लांबल्यास ती आणखी लांबण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. या पावसाचा द्राक्ष उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. .जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. द्राक्षबागांच्या ऑक्टोबर छाटणीला सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरवात होते. खाण्यासाठी उत्पादन घेणारे शेतकरी लवकर अथवा उशिरा छाटणी करतात. तर बेदाणा उत्पादक बेदाणा शेडच्या उपलब्धतेनुसार टप्प्या-टप्प्याने छाटणी करतात..Grape Pruning Delay: द्राक्ष आगाप फळ छाटणीला ब्रेक.त्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे; मात्र सततच्या पावसाने बागांत पाणी साचले असून चिखल आहे. वाफशाअभावी सध्या छाटणी करता येत नाही. त्यासाठी १० ते १५ दिवस जावे लागणार आहेत. मात्र, पाऊस लांबल्यास ती आणखी लांबणीवर पडून बागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. .Grape Pruning : द्राक्ष छाटणीसह सोयाबीन काढणी होणार सुरू.दरवर्षी शेतकरी छाटणीचे योग्य नियोजन करतात. मात्र, यंदा पावसामुळे छाटणी लांबणीवर पडतानाच वेळापत्रक कोलमडले. येत्या काळात वाफसा मिळाल्यावर एकाच वेळेस छाटणी केल्यास बाजारात एकदम माल येऊनही नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे..पानगळ झाल्यास अडचणसततचा पाऊस व पानांवर २४ तासांहून अधिक काळ पाणी राहिल्यास करपाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. शिवाय, त्यामुळे पानगळही होऊ शकते. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांना वेळेत छाटणी करावी लागणार आहे. त्यानंतर बागा पावसात सापडल्यास घड जिरण्याच्या समस्येसह रोगराईला सामोर जावे लागू शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.