New Delhi News: राजधानी दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पाणीपातळीत शुक्रवारी वाढ झाली. येथील जुन्या रेल्वे पुलाजवळ यमुनेची पातळी २०७.३३ मीटर एवढी नोंदविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून हरियानामधून यमुनेत पाणी सोडण्यात येत असल्याने यमुनेच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. .यामुळे आसपासच्या सखल भागात पाणी आले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिकांना अन्यत्र स्थलांतर करावे लागले आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात पोहण्यास किंवा नौकाविहारास जाऊ नये असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे..Yamuna River Flood : मुसळधार पावसामुळे दिल्लीत यमुना नदीला पूर.३५० यात्रेकरूंची सुटकासिमला : हिमाचल प्रदेशातील भूस्खलानामुळे अडकून पडलेल्या सुमारे ३५० यात्रेकरूंची भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका केली. त्यांना भरमौर येथून चंबा येथे आणण्यात आले. हे सर्वजण मणिमहेश यात्रेसाठी हिमाचलमध्ये आले होते. मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे चंबा जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक यात्रेकरू अद्यापही अडकून पडले आहेत..Punjab Flood Crisis: पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे ८ हजार कोटींच्या निधीची मागणी; कृषिमंत्री गुरमीत सिंह यांचे आवाहन .मुसळधार पावसामुळेहिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी नुकतीच हवाई पाहणी करत राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला.जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे २५०हून अधिक घरांचे नुकसान ९००हून अधिक नागरिकांचे स्थलांतर.यमुनेच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील काही ठिकाणी पुराचे पाणी आल्याने सुमारे ५५ कुटुंबांचे स्थलांतरअरुणाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.