Raigad News: पाणी हे जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून, वाढती लोकसंख्या, जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान आणि अनियंत्रित पाण्याचा वापर यामुळे सध्या अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे..या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी प्रभावी व पर्यावरणपूरक उपाय म्हणून वनराई बंधारा ही संकल्पना महत्त्वाची ठरत आहे..Vanrai Bandhara: पूर्व विदर्भात महिन्यात १४१९ वनराई बंधारे पूर्ण; शेतीला दिलासा.याच अनुषंगाने कोकण उन्नती मित्र मंडळ संचालित वसंतराव नाईक महाविद्यालय, मुरूड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) श्रमशिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मुरूडनजीकच्या तेलवडे ग्रामपंचायत हद्दीत वनराई बंधाऱ्याचे बांधकाम केले आहे..Vanrai Bandhhara : रायगडला पाणीटंचाईपासून दिलासा देणारे वनराई बंधारे.या उपक्रमाच्या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी मनोज कदम, आदिराज चौलकर, प्रदीप मालचे, पराग भोजने, उपसरपंच नीलेश तांबडकर, डाटा ऑपरेटर जितू करमरकर, प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, एनएसएस युनिट क्रमांक १० चे प्रमुख श्रीशैल बहिरगुडे, डॉ. गजानन मुनेश्वर, डॉ. सुभाष म्हात्रे, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते..हा बंधारा माती, दगड, वाळू तसेच सिमेंटच्या गोण्या व स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य वापरून उभारण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.