Fertile Land Fraud : चंद्रपूर बाबूपेठ-सास्ती नवीन रेल्वेमार्गासाठी कढोली (बु.), मानोली (बु.) आणि गोवरी परिसरातील सुपीक शेतजमिनींचे भूसंपादन सुरू आहे. बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प मोबदला देऊन जमीन संपादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे..या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालयाने ९ जुलै २०२५ रोजी भूसंपादनाची अधिसूचना जारी केली. त्यानंतर मोजणी, मागील तीन वर्षांतील जमीन व्यवहार आणि रेडीरेकनर दराच्या आधारे कढोली परिसरातील जमिनीचा दर ३ लाख ५० हजार रुपये प्रति एकर (८ लाख ७२ हजार रुपये प्रति हेक्टर) निश्चित करण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, परिसरातील सध्याचा बाजारभाव सुमारे ५० लाख रुपये प्रति एकर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. .Agrowon Podcast: कापूस बाजारात तेजी; सोयाबीन दर टिकून, ऊस एफआरपी जाहीर, हिरव्या मिरची दरात चढ-उतार तर हरभऱ्यावर दबाव.त्यामुळे बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प दराने जमीन घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. रेल्वे मार्गासाठी प्रति एकर ६० लाख रुपये मोबदला व नुकसानभरपाई द्यावी, भूसंपादनाची सक्तीची अधिसूचना रद्द करावी आणि वेकोलि (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड) नेच रेल्वेमार्गासाठी जमीन संपादित करून ती रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. रेल्वेमार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची, तर काहींच्या शेतजमिनीचे दोन तुकडे होण्याची शक्यता आहे. परिणामी उर्वरित शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. भविष्यात या मार्गावरून कोळशाची वाहतूक वाढल्यास धूळ व प्रदूषणाचा शेतीवर परिणाम होण्याची शक्यताही शेतकऱ्यांनी व्यक्त केली..वेकोलि जमीन संपादित करताना कोरडवाहू जमिनीसाठी आठ लाख रुपये, तर सिंचन क्षेत्रासाठी दहा लाख रुपये प्रति एकर मोबदला देते. पात्र प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची तरतूद असून रोजगार न मिळाल्यास अतिरिक्त नुकसानभरपाईची तरतूद असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वेकोलिला तुलनेने अधिक मोबदला आणि रेल्वेसाठी कमी दर का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे..Interview With Niraj Hatekar: शेती प्रश्नाचा समग्र विचार करणे आवश्यक.अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला जितेंद्र बोबडे, राजेंद्र बोबडे, विठोबा हिंगाणे, खुशाल अडवे, राकेश हिंगाणे, विनोद आस्वले, देवराव हिंगाणे, महादेव आसुटकर, लक्ष्मण आगलावे, विलास वाघमारे, अभय वैद्य, दिनेश हिंगाणे आणि विनोद अडवे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते..खासदार, आमदारांना निवेदनविशेष ग्रामसभेत वेकोलिनेच जमीन संपादित करावी, योग्य नुकसानभरपाई तसेच प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सुविधा द्याव्यात, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, या ठरावाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. भूसंपादन व मोजणी अधिकाऱ्यांना तीनवेळा मोजणी करण्यास विरोध केल्यानंतर २७ जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मोजणीनंतर योग्य दर देण्याचे आश्वासन मिळाले; मात्र प्रत्यक्षात कमी दर कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. योग्य मोबदल्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे निवेदने देण्यात आली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.