Nature Preservation: निसर्ग संवर्धनासाठी देशी वृक्ष संवर्धन
Tree Conservation : पूर्वीच्याकाळी शेती बांधावर चिंच, रायवळ आंबा, भोकर, चार, नेरली, बोराट्या ही वृक्ष संपदा दिसायची. कालांतराने काही ठिकाणी बांध नामशेष होऊन झाडे ही केवळ शेत सीमेच्या खुणा झाली आहेत. परंतु निसर्ग साखळी जपण्यासाठी तसेच औषधी गुणधर्म लक्षात घेऊन त्यांची जोपासना आणि लागवड आवश्यक आहे.