Latur News: राज्याचे लक्ष लागलेल्या येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीसोबत युती करून आमदार अमित देशमुख यांच्या प्रभावी राजकीय खेळीने काँग्रेसला ४३ तर वंचितला चार जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत नसलेली युती व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर केलेली टिपणी भाजपला चांगलीच महागात पडली. मागील टर्ममध्ये सत्तेत असलेल्या भाजपला केवळ २२ जागा मिळाल्या. तर स्वतंत्र बाणा जपूनही राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले..राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) पक्षाला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. भाजपचे बहुमत असताना दोन नगरसेवक फोडून महापौर झालेले काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश करत राजकीय वातावरण तापवले होते. .Local Body Result: सावंतवाडी, वेंगुर्लेत भाजप, मालवणात शिंदे शिवसेना .मोठ्या संख्येने जागा जिंकून हा पक्ष किंकमेकर होण्याचे भाकीत गोजमगुंडे यांनी मतदानापूर्वी व्यक्त केले होते. मात्र, गोजमगुंडे सोडले त्यांनी त्यांनी पक्षाकडून उभा केलेले ५९ पैकी एकही उमेदवार विजयी झाले नाहीत. उलट अनेक प्रभागात भाजपची मते खाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी काँग्रेस उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सोपा केला. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका भाजपला बसला. .Local Body Result: फुलंब्रीत भाजपला मोठा धक्का.एकूणच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची बी टीम म्हणूनच काम केल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या ७० जागांसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान झाले. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या प्रचार सभांनी चांगलीच रंगत आणली होती. यात निकालात बदल होऊन विजयी उमेदवार पराभूत झाले. एका उमेदवाराची फेरमतमोजणीची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली..जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीवरही परिणाममहानगरपालिकेच्या निकालाचा परिणाम शुक्रवारपासून होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. या निकालाने निवडणुकीतील समीकरणे बदलतील, असे भाकीत वर्तवले जात आहे. पूर्वीची नगरपालिका व आताच्या महानगरपालिकेवर अडीच वर्षाचा अपवाद सोडला तर काँग्रेसचे वर्चस्व आहे. शुक्रवारच्या निकालामुळे लातूर हा पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.