Congress To Launch MGNREGA Bachao Andolan: ग्रामीण रोजगार हमी योजना 'मनरेगा'च्या जागी व्हीबी जी- राम जी कायदा आणल्याबद्दल काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. महात्मा गांधीजींचे नाव पुसून टाकण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांनी ५ जानेवारी २०२६ पासून 'मनरेगा बचाव आंदोलन' सुरू करणार असल्याची घोषणा शनिवारी (दि.२७ डिसेंबर) केली..महात्मा गांधी यांच्या नावाने असलेली योजनाच बदलून टाकणे हा राष्ट्रपित्याचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसच्या बैठकीत, आम्ही याबाबत शपथ घेतली. आम्ही मनरेगा प्रश्नी देशभरात एक मोठे आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली ५ जानेवारीपासून मनरेगा बचाव आंदोलन सुरू करु, असे खर्गे यांनी सांगितले.."आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या (मनरेगा) बाजूने उभे आहोत. मनरेगा ही केवळ एक योजना नाही तर भारतीय संविधानाने रोजगाराची हमी दिलेला एक अधिकार आहे. मनरेगामधून गांधीजींचे नाव पुसून टाकण्याचे जे काही षडयंत्र रचण्यात आले; त्याला लोकशाही पद्धतीने विरोध करण्याची आम्ही शपथ घेतली आहे," असेही ते म्हणाले..VB G RAM G Bill: व्हीबी- जी राम जी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?.मनरेगा रद्द केल्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खर्गे यांनी दिला आहे. .मंत्रिमंडळाशी सल्लामसलत न करता आणला व्हीबी जी- राम जी कायदातर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या नव्या कायद्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित मंत्री अथवा केंद्रीय मंत्रिमंडळाशी कोणत्याही प्रकारची सल्लामसलत न करता 'मनरेगा'च्या जागी दुसरा कायदा आणल्याचा आरोप राहुल गांधींनी केला..VB-G RAM G : अपयशाच्या स्मारकाचे नामांतर.'मनरेगा ही केवळ एक योजना नव्हती; तर ती हक्कांवर आधारित एक संकल्पना होती. या संकल्पनेवरच हल्ला करण्यात आला. याबाबत मला सांगण्यात आले आहे की संबंधित मंत्री अथवा मंत्रिमंडळाशी कसलीही सल्लामसलत न करता हा निर्णय थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतला,' असा दावा राहुल गांधी यांनी केला.."खर्गेजींनी म्हटल्याप्रमाणे, आम्ही त्याचा विरोध करणार आहोत. आम्ही त्याविरोधात लढू. मला विश्वास आहे की संपूर्ण विरोधी पक्ष या मुद्यावरुन एकजुटीने उभे राहील.", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात 'मनरेगा'चे नाव आणि स्वरुप बदलण्यात आले आहे. त्याऐवजी विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका मिशन अर्थात व्हीबी- जी राम जी विधेयक आणण्यात आले. त्याला संसदेच्या अधिवेशनात मंजुरी देण्यात आली. त्यानंतर त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.