Rahul Gandhi Punjab Visit : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सोमवारी (१५ सप्टेंबर) पंजाबमधील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला..त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग, पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा, अमृतसरचे खासदार गुरजीत सिंग औजला आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते..अमृतसरमध्ये पोहोचल्यानंतर, त्यांनी अजनाला येथील घोनेवाल गावाला भेट दिली. त्यांनी पूरग्रस्तांना आधार देत नुकसानीची चौकशी केली आणि त्यांना मदतीचे आश्वासन दिले. अजनाला येथील अनेक गावांना पुराच्या मोठा फटका बसला होता..Punjab Floods: बुडता पंजाब.अर्ध्या किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टरमधून प्रवासत्यानंतर राहुल गांधी यांनी गुरुदासपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचीही पाहणी केली. येथील एका गावातील बंधारा फुटून शेती आणि घरे पाण्याखाली गेली होती. त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी गावात पायी चालल्यानंतर अर्ध्या किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टरमधून प्रवास केला. .पंजाबला गेल्या काही दशकांतील सर्वात मोठ्या पूर आपत्तीचा सामना करावा लागला आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने सतलज, बियास आणि रावी नद्यांसह नाल्यांना पूर आला होता..Punjab Flood: पंजाबमधील पूर संकट; केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांनी आढावा घेतला.१.९८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपंजाबमध्ये पुराशी संबंधित घटनांमधील मृतांचा आकडा ५६ वर पोहोचला आहे. तसेच शेतपिकांना मोठा फटका बसला आहे. येथील एकूण १.९८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंजाबमधील २३ जिल्ह्यातील २,०९७ गावांचे मोठे नुकसान झाले आहे..याआधी ९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली होती. त्यांनी येथील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंजाबसाठी १२ हजार कोटींच्या निधीव्यतिरिक्त १,६०० कोटींची आर्थिक मदत जाहीर केली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.