Nashik News: तळवाडे दिगर, ता. बागलाण येथील शेतकऱ्यांना सप्टेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ग्रामपंचायत कार्यालयात बसून केले होते. याबाबत विचारणा करण्यासाठी गावातील ग्रामस्थ जमा झाल्यानंतर ग्रामसेवक यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले..ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचे जवळचे जे शेतकरी आहेत त्यांच्या सात-बारावरील पूर्ण क्षेत्र, तर काहींचे सात-बारापेक्षा जास्त क्षेत्र दाखाविले आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष क्षेत्र नुकसानग्रस्त दाखवलेले क्षेत्र यांच्यात मोठी तफावत आहे. त्यामुळे अनुदानात गावातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला..Farmer Highway Protest: जमिनींच्या मोबदल्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा.ज्या कर्मचाऱ्यांनी याद्या बनविल्या त्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या वेळी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन सरपंच, उपसरपंच यांना देण्यात आले..Farmers Protest: बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शेतकरी धडकणार .‘‘या यादीत जो काही फरक असेल तो बघून सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल,’’ असे आश्वासन बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दूरध्वनीवरून दिले. यानंतर आंदोलन थांबवले व तहसीलनधील कर्मचाऱ्यांना निवेदन दिले..माझ्या नावावर दोन हेक्टर क्षेत्र असून, जेव्हा केवायसीची यादी आली तेव्हा माझ्या नावापुढे दोन हेक्टरी फक्त ३७ आर. क्षेत्र दाखविण्यात आले होते. तरी शासनाने याची दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा.- प्रदीप पवार, शेतकरी.संबंधित प्रकरणाची चौकशी करून त्यात योग्य ती दुरुस्ती करून शेतकन्यांना न्याय मिळवून दिला जाईल.- कैलास चावडे, तहसीलदार, बागलाण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.