Ladki Bahin E-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेत सदोष माहिती भरल्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ७५१ महिला अडचणीत आल्या आहेत. त्यांची पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे देत शासनाकडून जिल्हास्तरावर महिला व बालकल्याण विभागाला याद्या पाठविण्यात आल्या आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लाडक्या बहिणींना कार्यालयाचे खेटे घालावे लागत आहे..महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. यात प्रश्नच समजून न आल्याने ई-केवायसी करताना महिलांकडून चुकीचा पर्याय निवडण्यात आला. परिणामी योजनेतून महिला बाद झाल्या. योजनेच्या निकषानुसार पात्र, मात्र चुकीची माहिती भरलेल्या महिलांना एक संधी मिळावी म्हणून लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना केल्या आहे..Ativrushti E-KYC : राज्यातील किती शेतकरी ई-केवायसीमुळे अनुदानापासून वंचित?.या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाला याद्या देत या याद्यांची पडताळणी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आल्या आहे. प्रत्येक तालुका स्तरावर एक तर नागपूर शहरात सहा कार्यालयाकडे पडताळणीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, या अंगणवाडी सेविकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लाडक्या बहिणींना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे..Ladki Bahin Yojana E-KYC : पूरग्रस्त महिलांसाठी दिलासा! ‘लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी मुदत १५ दिवसांनी वाढवली.नागपूर शहरात २५ हजार बहिणींचा हप्ता चुकलानागपूर शहरात ई केवायसीत चूक झालेल्या २४ हजार ८७० लाडक्या बहिणींचा जानेवारी महिन्यात शासनाकडून मिळणारा हप्ता चुकला आहे. हा आकडा जिल्ह्यात १ लाख ४ हजार ७५० एवढा आहे..५४९ महिलांच्या खात्याला पुरुषांचे आधारयोजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या आयडीला फोटो महिलांचा तर त्याला आधार क्रमांक पुरुषांचे जोडले असल्याचे निदर्शनात आले. जिल्ह्यात अशी ५४९ प्रकरणे पुढे आल्याने लाभ बंद करण्यात आला आहे. तर ६५ वर्षांवरील ६ हजार ६४७, आणि २१ वर्षांखालील १ हजार १६४ मुलींचा हप्ता बंद करण्यात आला आहे..ई-केवायसीमध्ये ज्या महिलांच्या चुका आढळल्या, अशा महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊन हमीपत्र व आधारकार्ड देऊन पडताळणी करून घ्यावी, याशिवाय काही अडचण आल्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधवा.-सुनिल मेसरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नागपूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.