Solapur News: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचे भूत पुन्हा एकदा जिल्ह्याच्या मानगुटीवर बसले असून, सध्या या प्रकल्पावरून समर्थकांचे मोर्चे आणि विरोधकांचे दावे यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी तीव्र विरोध, मग मुख्यमंत्र्यांकडून मार्ग बदलण्याचे आश्वासन आणि आता पुन्हा ‘जुनाच मार्ग हवा’ म्हणून निघालेला मोर्चा, या चक्रव्यूहात नेमके काय होणार, या चिंतेने बाधित शेतकरी ग्रासले आहेत..महामार्ग नक्की कोणत्या गावातून आणि कोणाच्या शेतातून जाणार, या बाबत अद्यापही स्पष्टता नाही. जुना मार्ग रद्द झाल्याची चर्चा असतानाच, आता पुन्हा जुन्याच मार्गासाठी मोहोळमध्ये मोर्चे निघू लागल्याने, ‘‘नक्की मार्ग बदलला की बदलणार आहे,’’ असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत..Shaktipeeth Expressway: देवदेवतांच्या नावाखाली कशाला वरवंटा फिरवताय?; शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या प्लॅनवर राजू शेट्टींचा सवाल.तसेच आता या महामार्गाचे समर्थक विरुद्ध बाधित असा नवा संघर्ष उफाळला आहे. मोहोळमध्ये माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘‘हा रस्ता शहराच्या वैभवात भर टाकेल,’’ असे समर्थकांचे म्हणणे आहे, तर ‘‘ज्यांची जमीन जाणार नाही, तेच लोक समर्थन करत आहेत,’’ असा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे..यामुळे मोहोळमध्ये ‘शेतकरी विरुद्ध बिगर-शेतकरी’ असा नवा सामाजिक पेच उभा ठाकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समांतर रस्ते आणि बागायती जमिनी टाळण्यासाठी नवीन सर्व्हेचे आदेश दिले होते. मात्र नवीन यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आणि आता पुन्हा जुन्या मार्गासाठी मागणी वाढल्याने प्रशासकीय पातळीवर नेमके काय शिजतेय, याचा संभ्रम कायम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.