Marathwada floods: पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी (दि.२६) दिले. त्यांनी नुकताच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा, करमाळा तालुक्यांचा दौरा केला. काल त्यांनी लातूरमधील पाच- सहा तालुक्यांचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आज लातूर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली..''पूर परिस्थिती अतिशय भीषण आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांना शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. वस्तूस्थिती पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे माहिती पोहोचवली आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी जी काही आर्थिक ताकद उभी करायची आहे; ती उभी केली जाईल.'' असे योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. .Flood Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात खरीप पुरता ‘पाण्यात’.अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी नुकसानीचे पंचनामे, सर्वेक्षण काळजीपूर्वक करावे. पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे अचूक होणे गरजेचे आहे. खरडून गेलेल्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट द्यावेत आणि संयुक्त पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी आढावा बैठकीत दिले..राज्य शासनाने लातूर जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीची २४४ कोटी रुपयांची मदत दिली आहे. ही रक्कम येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करायला हवी. नुकसानीची मदत केली जाणारे बँक खाते कोणत्याही कारणाने होल्डवर ठेवले जाणार नाही, याची खबरदारी बँकांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केली..Maharashtra Floods: पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफमधून आर्थिक मदत मिळावी; मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्र सरकारला निवेदनाद्वारे विनंती.'नुकसानीच्या पंचनाम्यासाठी फिल्डवर जावे'ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीची मदत वितरीत करण्यात आली असली तरी सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे आणखी नुकसान झाले आहे. त्यामुळे या वाढीव नुकसानीचे पंचनामे करून किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याची नोंद घ्यावी. नुकसानीचे पंचनामे, सर्वेक्षण करताना संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी फिल्डवर जावून काम करावे. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या..पुराच्या पाण्यात काही ठिकाणी जनावरांचा चारा वाहून गेला आहे. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पशुसंवर्धन विभागाने तातडीने आवश्यक चाऱ्याची माहिती घेवून त्याबाबतचा प्रस्ताव पाठवावा, असे त्यांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.