Washim News: वाशीम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व परिणामकारक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. .जिल्हा नियोजन समितीची सभा श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.या वेळी आमदार श्याम खोडे, आमदार सई डहाके, किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्यासह इतर उपस्थित होते. खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे हेही दूरदृश्य प्रणालीद्वारे सभेत सहभागी झाले..District Development Plan: ‘नियोजन’च्या ५८२ कोटींच्या कामांना मान्यता .सभेदरम्यान जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा सविस्तर आढावा सादर केला. १४ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मागील सभेतील कार्यवाहीचा तपशील पाहून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/ओटीएसपी) २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच २०२५-२६ मधील पुनर्विनियोजन प्रस्तावांतर्गत बचत व अतिरिक्त मागणीवर चर्चा झाली..District Development Plan : नांदेडला ६३४ कोटींच्या आराखड्यास मान्यता.सभेत खासदार देशमुख यांनी ‘एमआयडीसी’साठी स्वतंत्र हळदी उद्योगाचे प्लॉट उपलब्ध करण्याची मागणी केली, तसेच रुग्णालयांनी रुग्णांची ऑनलाइन नोंदणी करावी आणि सिंचन विहिरींमध्ये लाभार्थ्यांकडून पैसे घेऊ नयेत, असे सांगितले. आमदार खोडे यांनी मंगरूळपीर ‘एमआयडीसी’तील वापरात नसलेले प्लॉट परत घेण्याची मागणी केली, तर आमदार सरनाईक यांनी शाळांवर सोलर पॅनेल बसवण्याचा प्रस्ताव मांडला..पालकमंत्री भरणे यांनी ट्रॅक पार्किंगसंबंधी रिंग रोडच्या कामासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी जिल्ह्यासाठी मंजूर निधी वेळेत व योग्य कामांसाठीच वापरण्याचे आणि सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व जबाबदारीने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.