Nagpur News: केंद्र सरकारकडून खत विक्रेत्यांसाठी (डीलर) निश्चित करण्यात आलेले मार्जिन अनेक खत कंपन्यांकडून दिले जात नसल्याने व्यवसायिकांची आर्थिक कोंडी होत आहे. डीएपी, एनपीके व एमओपी यांसारख्या महत्त्वाच्या खतांवर सरकारने मार्जिन जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात त्याचा परतावा मिळत नसल्याचा आरोप ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनने केला आहे..केंद्र सरकारने डीएपी व एमओपी खतांवर दोन टक्के, तर एनपीके खतांवर चार टक्के डीलर मार्जिन निश्चित केले आहे. मात्र अनेक कंपन्या हे मार्जिन देत नसल्यामुळे विक्रेत्यांच्या भांडवलावर मोठा ताण येत आहे. त्यामुळे थकित मार्जिन तत्काळ अदा करावे, तसेच मार्जिनमध्ये वाढ करावी, अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आली आहे..Fertilizer Dealers Issue: निविष्ठा विक्रेत्यांना आरोपीच्या यादीतून कायमचे वगळा.या संदर्भात द फर्टीलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये युरियाच्या बाबतीत घाऊक विक्रेत्यांसाठी दहा रुपये प्रति बॅग, तर किरकोळ विक्रेत्यांसाठी २५ रुपये प्रति बॅग मार्जिन निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे..Fertilizer Scam: जळगाव जिल्ह्यात २०० खतविक्री केंद्रचालकांना नोटिसा.दरम्यान, अनेक खत कंपन्या त्यांच्या मुख्य उत्पादनासोबत इतर पूरक उत्पादने घेण्याची सक्ती करीत असल्याचा गंभीर मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. युरियाची गरज भागवण्यासाठी विक्रेत्यांना नाईलाजाने ही अतिरिक्त उत्पादने खरेदी करावी लागतात. मात्र ही उत्पादने विकली जात नसल्याने ती वर्षानुवर्षे गोदामात पडून राहतात. त्यामुळे साठवणूक, व्याज व देखभाल यावर डीलरचा अतिरिक्त खर्च वाढतो आणि गुंतवणूक अडकून राहते..याशिवाय, खत नियंत्रण आदेश १९८५नुसार खत विक्री केंद्रापर्यंत खत पोहोचविण्याची जबाबदारी कंपन्यांवर असताना अनेक कंपन्या केवळ ‘रेक पॉइंट’पर्यंतच माल पुरवठा करतात. पुढील वाहतूक डीलरला स्वतःच्या खर्चाने करावी लागत असल्याने त्याचा आर्थिक बोजा वाढतो.या सर्व अनुचित प्रथा तत्काळ बंद करून खत विक्रेत्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनने दिला आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.