Pune News: अन्न प्रक्रिया उद्योगासाठी प्रसिद्ध असलेला जागतिक ‘गल्फ फूड २०२६ एक्स्पो’ २६ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान दुबई येथे होत आहे. ही संधी साधत महाराष्ट्रातील शेतकरी, प्रक्रिया उद्योजक, स्टार्टअप, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार यांच्यासाठी ‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने २५ ते ३० जानेवारी दरम्यान अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यामध्ये शेतकरी, प्रक्रिया उद्योजकांसह उदयोन्मुख उद्योजकांना जागतिक बाजारपेठ, निर्यातदारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. .गल्फ फूड २०२६ एक्स्पोमध्ये जगभरातील आयातदार, निर्यातदार, वितरक, सुपर मार्केट चेन, हॉटेल्स, फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग कंपन्या एकत्र येणार आहेत. त्यांच्याशी संवादातून जागतिक बाजाराचा ट्रेंड, ग्राहकांची अपेक्षा, कोणत्या उत्पादनांना मागणी आहे याची चाचपणी करता येणार आहे..Warana Agri Expo: वारणा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन.यातून महाराष्ट्रातून कोणती शेती व प्रक्रिया उत्पादने जागतिक बाजारपेठेत पाठवू शकतो, याचे मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय दुबईतील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता येणार आहेत. यामध्ये बुर्ज खलिफा या जगातील सर्वाधिक उंच आणि भव्य इमारतीसह विविध स्थळांचा समावेश आहे..Agriculture Expo 2025: ज्ञान-तंत्रज्ञानाची शिदोरी घेऊन शेतकरी परतले.या दौऱ्यासाठी प्रतिव्यक्ती एक लाख चाळीस हजार (अधिक जीएसटी) खर्च येणार आहे. त्यामध्ये विमान प्रवासासह, व्हिसा शुल्क, प्रवासी विमा, स्थानिक प्रवास, नाश्ता, दोन्ही वेळचे भोजन, गल्फ फूड एक्स्पोचे तिकीट आदी खर्चाचा समावेश आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून ३ जानेवारीपर्यंत आपली नाव नोंदणी करावी. त्यानंतर सर्व इच्छुकांना झूम कॉलद्वारे दौऱ्याची माहिती देऊन पैसे भरण्यासह पुढील प्रक्रिया समजावून सांगितली जाईल..आयात, निर्यातदारांशी थेट संवाददौऱ्यात सहभागी होणाऱ्यांना तेथील भारतीय आयात निर्यातदारांसह लॉजिस्टिक एजंट आणि क्लिअरिंग एजंट यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. तसेच कंटेनर कसे क्लिअर होतात, कोणती कागदपत्रे लागतात, किती वेळ लागतो, खर्च कुठे वाढतो आणि कुठे वाचतो, याची व्यवहार्य माहिती मिळणार आहे. दुबईतील सर्वांत मोठ्या ‘अल अवीर’ या फळे आणि भाजीपाला मार्केटला भेट देता येणार आहे. या ठिकाणी भारतासह जगभरातून आलेली फळे, भाजीपाल्याची खरेदी विक्री कशी होते, स्पर्धात्मक दर कसे ठरतात याची माहिती प्रत्यक्षात मिळणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.