Latur News : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बुधवारी (ता. २०) उदगीर तालुक्यातील पूरग्रस्त बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागातील शेती, घरांचे नुकसान आणि इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन पंचनामे, उपाययोजना आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला. .जिल्हाधिकाऱ्यांनी बोरगाव येथील तानाजी धोंडीबा सुभाने, हनुमंत अर्जुन सुभाने आणि रमेश अर्जुन सुभाने यांच्या घरांची पाहणी केली, जिथे तीन ते चार फूट पाणी साचले होते. त्यांनी गावकऱ्यांना प्रशासनाच्या सर्व उपाययोजनांची माहिती देऊन आश्वस्त केले. पीक नुकसानी, मृत जनावरे, पडझड झालेली घरे आणि इतर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले..Crop Damage Compensation : पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या .बोरगाव आणि धडकनाळ गावातील विद्युत पुरवठा आजच सुरळीत करण्याच्या सूचना देतानाच, गावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरणार नाही यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ठाकूर यांनी दिल्या. .विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीचे त्यांनी कौतुक केले. या वेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उपविभागीय कृषी अधिकारी यादव, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते..Rain Crop Damage : अमरावती विभागात ३ लाख हेक्टरला फटका .नुकसानग्रस्तांना भरीव मदत द्यापाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना भरीव मदत करावी व त्यांना या अडचणीच्या काळात धीर द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे केली..राज्यात १४ लाख एकरावरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून मराठवाड्यात तीन लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांना फटका बसण्याबरोबरच अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यातील अनेक जनावरे वाहून गेली आहेत. आत्तापर्यंत ४९८ जनावरे दगावल्याची माहिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.