Nashik News : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. सेवा पंधरवाडा संदर्भात शासकीय कार्यालयांनी केलेल्या नावीन्यपूर्ण बाबींचा आढावा वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येणार असून हे अभियान लोकसहभागातून सर्वांनी यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत दिल्या..जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात याबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलवले, सीमा अहिरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, तहसीलदार (महसूल) आबासाहेब तांबे, तहसीलदार माधुरी आंधळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते..सर्व शासकीय यंत्रणांनी या सेवा पंधरवाडाची प्रभावी अंमलबजावणी करावी. राबविण्यात येणाऱ्या उल्लेखनीय बाबींमध्ये लोकाभिमुख सेवांचा समावेश असणे आवश्यक आहे. तयार केलेले नियोजन सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिले. सेवा पंधरवड्यात महसूल विभागाने केलेला नियोजन आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले..Rural Development: पंचायत राज अभियानामध्ये ग्रामपंचायतीची निवड.अपर जिल्हाधिकारी श्री. पारधे यांनी याबाबत माहिती उपस्थितांना विशद केली. अभियान तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात पाणंद रस्तेविषयक मोहीम घेण्यात येणार असून, यात शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण भूमी अभिलेख व उप अधिक्षक भूमी अभिलेख यांच्या समन्वयातून केले जाणार आहे. यात शेतरस्त्यांची मोजणी, नोंदी, सीमांकन व रस्त्यांसाठी विशिष्ट सांकेतांक निश्चित करणे व पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करणे ही कार्यवाही केली जाणार आहे..दुसऱ्या टप्प्यांत २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत सर्वांसाठी घरे हा उपक्रम राबविला जाणार असून यात घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे, शासकीय जमिनीवर असलेली अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे, अ, ब, क, ड प्रस्ताव, ना हरकत दाखल्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविणे ही कार्यवाही केली जाणार आहे..Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ.तिसऱ्या टप्प्यात २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असून यात गट विकास अधिकारी यांनी स्मशान भूमीसाठी उपलब्ध जागांचे प्रस्ताव ना-हरकत दाखल्यांसह सादर करावयाचे आहेत..सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे आयुष्यमान कार्ड काढणे, रेशनकार्ड डाटा ऑनलाइन करणे, स्वच्छता अभियान, महसूल अदालत, वनपट्टे दाव्यांची निर्गतीची कार्यवाही व वाटपाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री. पारधे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.