Agri Department : विदर्भातील संत्रा बागांची उत्पादकता आणि आयुष्य वाढविण्यासाठी रोगमुक्त व दर्जेदार कलम निर्मितीची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) कृषी विभागाने तयार करावी. यासाठी कृषी विद्यापीठ आणि प्रगतिशील संत्रा नर्सरीधारक यांच्याशी चर्चा करून एकसमान मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कृषी विभागाला दिले..काटोल तालुक्यातील हातला येथील ग्रीन व्हॅली नर्सरीला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नर्सरीतील विविध सुविधांची पाहणी केली..Vidarbha Orange Farming : संत्रा ठरेल विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा आधार. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना कडू, उपविभागीय कृषी अधिकारी बळीराम सातपुते, तालुका कृषी अधिकारी जयंत कौटकर, मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र बांबल आदी उपस्थित होते..Orange Fruit Drop Issue: अजैविक ताणामुळे संत्रा बागांत फळगळ समस्या.ग्रीन व्हॅली नर्सरीचे संचालक अखिल जुनघरे यांच्याशी चर्चा करताना जिल्हाधिकाऱ्यांनी संत्रा व मोसंबी कलम निर्मितीची सद्यःस्थिती जाणून घेतली. .संत्रा पिकावरील किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सुरुवातीपासूनच रोगमुक्त व सशक्त कलमे तयार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.