Satara News: सातारा जिल्ह्यात थंडी वाढल्याने रब्बी पेरणीच्या कामांना वेग सुरू असून पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत ८२ टक्के पेरणीची कामे उरकली आहेत. ज्वारी, मका पिकांची पेरणीची कामे उरकली असून हरभरा व गहू पिकांच्या पेरण्या वेगात सुरू आहेत..जिल्ह्यात यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने पेरणीच्या कामात अडथळा आला होता. सध्या पेरणीची कामे जलदगतीने सुरू आहेत. रब्बी ज्वारी व मका पिकांची पेरणीची कामे उरकली आहे. पावसाच्या ओलीवर ज्वारी पेरा केला असल्याने उगवण चांगली होत आहे. सध्या थंडी सुरू झाली असल्याने हरभरा, गहू पिकांच्या पेरण्यांस वेग आला आहे..Rabi Sowing: उशिराच्या वाफशामुळे रब्बी पेरा लांबणीवर .काही ठिकाणी आंतरपीक म्हणून गहू, हरभरा केला जात आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात कांदा लागवड सुरू आहे. तर पश्चिम भागात रोपे तयार करण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यांत पेरणीक्षेत्र जास्त आहे..जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी २ लाख १३ हजार २१० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून यापैकी १ लाख ७५ हजार ७४ हेक्टरवर पेरणीची कामे झाली आहेत. रब्बी ज्वारीच्या १ लाख ३५ हजार ५३२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १ लाख १७ हजार ७५५ हेक्टर पेरणी झाली आहे..Rabi Sowing: अकोल्यातील रब्बी लागवड ६० टक्क्यांवर.मक्याच्या १० हजार २१० हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त १४ हजार ५६१ हेक्टर पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या २७ हजार ७५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १९ हजार ४९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाच्या ३७ हजार ३७४ हेक्टर क्षेत्रापैकी २७ हजार ६३२ हेक्टरवर लागवड झाली आहे..तालुकानिहाय क्षेत्र हेक्टरमध्येसातारा १२७२५, जावळी ५८२०, पाटण १६६३५, कऱ्हाड ९२९५, कोरेगाव २००९५, खटाव ३०१३९, माण ३२६७७, फलटण २३६१९, खंडाळा १२३४०, वाई ११४५६, महाबळेश्वर २६७..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.