Pune News: गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढू लागली आहे. जिल्ह्यात रब्बीच्या शेतीकामांना वेग आला असून काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात रब्बीचे एकूण एक लाख ८७ हजार ६९५ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत २५ हजार २१६ हेक्टर म्हणजेच सरासरी १३ टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी, भूजल पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात हवामान कोरडे आहे. वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला असून जमीन वाफसा अवस्थेत येत आहे. त्यातच थंडी वाढू लागल्याने रब्बी पेरण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकरी कर्ज काढून रब्बीची तयारी करू लागला आहे..Rabi Season: नांदेड जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग; २५ हजार हेक्टर पेरा.ज्वारी व हरभरा पिकांच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याचा अंदाज आहे. काही शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केलेले ज्वारी पीक उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे. गहू, हरभरा, मका पिकांच्या पेरण्यांना आता पोषक वातावरण तयार झाले असल्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. एक ते दीड महिन्यात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे..सध्या खरीप हंगामातील भात पिके निसवण्याच्या व दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे. तूर पिके फुलोरा अवस्थेत आहे. जास्त पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून, सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेत ५० ते ६० टक्के घट आली आहे..दरम्यान खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. ते शेतकरी रब्बीतील पिकांमधून भरपाई काढण्याची आशा ठेऊन तयारी करीत आहेत. काही शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी खते, बियाण्याची खरेदी सुरू आहे..Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज.जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)पीक सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्ररब्बी ज्वारी ८८,३३६७, २१,४३२गहू ४२,५७४, ६१७मका २५,८२०, १९०१इतर रब्बी तृणधान्य २०२, २०हरभरा २५,७६६, ८६८.इतर रब्बी कडधान्य ४६५१, ३७९करडई ११९ ०तीळ १५ ०जवस ३ ०सूर्यफूल १०७ ०इतर रब्बी गळीतधान्य १०१ ०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.