हवामान सल्ला विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक ५ ते ११ डिसेंबर व १२ ते १८ डिसेंबर या दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. .तूरतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंगमाशीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे निरिक्षण करावे. आर्थिक नुकसानीची पातळी जाणून घेण्यासाठी शेतात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. शेतामध्ये इंग्रजी ‘T’ आकाराचे पक्षिथांबे उभारावेत..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.रासायनिक फवारणी (प्रमाण ः प्रति १० लिटर पाणी)शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी,इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ४.४ ग्रॅम किंवास्पिनोसॅड (४५ टक्के) ३ मिलि किंवाइन्डोक्झाकार्ब (१४.५ टक्के) ८ मिलि किंवाक्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ३ मिलिशेंगमाशीच्या व्यवस्थापनासाठी,लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के) ८ मिलि किंवाल्युफेन्यूरॉन (५.४ टक्के) १२ मिलितूर पिकास आवश्यकतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे..ऊसपूर्व हंगामी उसाची लागवड लवकरात लवकर पूर्ण करावी. ऊस लागवड करताना नत्र ३० किलो, स्फुरद ८५ किलो व पालाश ८५ किलो (३२७ किलो १०:२६:२६ किंवा १८५ किलो डायअमोनियम फॉस्फेट अधिक १४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ६५ किलो युरिया अधिक ५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक १४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.ऊस पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, व्यवस्थापनासाठीक्लोरपायरीफॉस (२० टक्के) २५ मिलि किंवाक्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ४ मिलिप्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.आवश्यकतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे..Crop Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग).हळदहळदीचे उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत.हळदीच्या पानावरील ठिपके किंवा करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी,ॲझॉक्सिस्ट्रॉबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १० मिलि अधिक स्टीकर ५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..हरभराहरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी सुरुवातीपासूनच तण पीक विरहित ठेवणे आवश्यक आहे. पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी करावी.हरभरा पिकात सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे. आवश्यकतेनुसार हलके पाणी द्यावे.पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पिकास १९:१९:१९ या खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.मर, मूळकूज, मानमूज या रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे निरिक्षण करावे. १० टक्के पर्यंत प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त भागात ट्रायकोडर्मा २०० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी..Crop Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग).करडईवेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी, शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी.पेरणीनंतर २५ ते ५० दिवसांपर्यंत एक ते दोन कोळपण्या व खुरपण्या करून पीक तण विरहीत ठेवावे.बागायती करडई पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास युरिया ६५ किलो प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे..संत्रा/मोसंबीसंत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी ००:००:५० हे खत १५ ग्रॅम प्रति लिटर पाणी तसेच जिबरेलिक ॲसिड १ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.आंतरमशागतीची कामे करून बागेत तण नियंत्रण करावे..डाळिंबडाळिंब बागेत फळवाढीसाठी ००:००:५० या खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..भाजीपालामिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी,मायक्लोब्यूटॅनिल (१० टक्के डब्ल्यूपी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.टीप - कीडनाशकांच्या मात्रा हाय व्हॉल्यूम (उदा. पाठीवरील पंप) फवारणी पंपासाठीच्या आहेत.- डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२(ग्रामीण कृषी मौसम सेवा आणिकृषी विद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.