Sindhudurg News: कोकणातील नारळ आणि सुपारी ही दोन्ही पिके वातावरणातील बदलामुळे अडचणीत आली आहेत. या पिकांना विमा संरक्षण नसल्याने उत्पादकही आर्थिक संकटात सापडले आहेत..कोकणात आंबा, काजू याबरोबरच नारळ आणि सुपारी ही पिकेही महत्त्वाची आहेत. सर्वसाधारणपणे नारळ बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून सुपारीची लागवड केली जाते. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यांमध्ये मुख्य पीक हे नारळ व सुपारी आहे..Coconut Farming Success: ओसाड रानात फुलविली नारळ बाग.जिल्ह्यात सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली येते. त्यापेक्षा काही अंशी कमी सुपारीचे क्षेत्र आहे. वातावरणातील बदलामुळे वाढलेले कीडरोग, बुरशीचे प्रमाण आणि प्राण्यांच्या उपद्रवाने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि देखभालखर्च यांचा ताळमेळ बसताना दिसत नाही..यंदाही जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त पीक गळून फुकट गेले आहे. शिवाय वातावरणातील चढ-उतारामुळे संवेदनशील असलेल्या या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. नारळावरही वातावरण बदलाचा परिणाम होऊन उत्पन्न कमी झाले आहे. नारळाचे उत्पन्न अगदी ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. सध्या नारळाला चांगला दर मिळत असला, तरी हातात पीकच नसल्याने बागायतदार हतबल आहेत..Farmer Issue: मका, सोयाबीन खरेदीतील विलंबामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले : राजू शेट्टी.या दोन्हीही पिकांचा पीक विमा योजनेत समावेश नसल्यामुळे शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत आला आहे. त्याला या अडचणींच्या गर्तेतून सोडविण्यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु त्याचा अद्याप सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही, असे शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले..नारळ आणि सुपारी उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. भविष्यात हे उत्पादक कर्जबाजारी होणार आहेत. त्यामुळे शासनाने या दोन्ही पिकांचा समावेश पीक विमा योजनेत करावा. जेणेकरून, थोडीफार नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळू शकेल.दीपक नाटेकर, बागायतदार, तळकट.सतत पडणाऱ्या पावसामुळे बुरशीजन्य रोगांसह कीड-रोग वाढतात. मोठ्या प्रमाणात फळगळ होते. शेतकऱ्यांनी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी खबरदारी घ्यावी. सुपारी बागेत स्वच्छता ठेवावी. पूर्ण बागेत सूर्यप्रकाश पोहोचेल, अशी रचना ठेवावी. विद्यापीठाने बुरशीकरिता शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करावी.डॉ. के. व्ही. मालसे, शास्त्रज्ञ, भाट्ये संशोधन केंद्र, रत्नागिरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.