Raigad News: सागर मार्गाने देशविघातक कारवाया झाल्याचे गेल्या काही काळापासून स्पष्ट झाले आहे. मुंबई हल्ला असो किंवा अलीकडील दिल्लीतील बॉम्बस्फोट, सागरी सुरक्षा ढिली पडली तर त्याचा फायदा दहशतवादी आणि तस्कर घेतात. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षेची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून, परप्रांतीय मच्छीमारांची कसून तपासणी करण्यात येत आहे. बिहार, उत्तर प्रदेश येथून आलेल्या २३० मच्छीमारांकडे कागदपत्रे नाहीत. या मच्छीमारांना आधी कागदपत्रे सादर करा, नंतरच मासेमारीसाठी जा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत..रायगड किनारपट्टीवर मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो आणि या व्यवसायात काम करणाऱ्यांपैकी तब्बल ८० टक्के कामगार उत्तर प्रदेश व बिहार येथील आहेत. मात्र यातील अनेकांकडे ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे नाहीत. ही कागदपत्रे होडीचा मालक तयार करुन ती संबंधित मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर विभागाकडे देत असतो. .Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक.अनेक वेळा कामगार मिळत नसल्याने कागदपत्रे न घेताच त्याला कामावर ठेवले जाते. या कामगारांच्या आडून देशविघातक कृत्ये होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कागदपत्रे सादर करण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट आदेश दिले आहेत..रायगड किनारपट्टीवर मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो आणि या व्यवसायात काम करणाऱ्यांपैकी तब्बल ८० टक्के कामगार उत्तर प्रदेश व बिहार येथील आहेत. मात्र यातील अनेकांकडे ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे नाहीत. ही कागदपत्रे होडीचा मालक तयार करुन ती संबंधित मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर विभागाकडे देत असतो. अनेक वेळा कामगार मिळत नसल्याने कागदपत्रे न घेताच त्याला कामावर ठेवले जाते. या कामगारांच्या आडून देशविघातक कृत्ये होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कागदपत्रे सादर करण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट आदेश दिले आहेत..CM Devendra Fadnavis: अतिवृष्टी मदतीवरून मुख्यमंत्र्यांकडून झाडाझडती.२३० परप्रांतीयांचा बुडणार रोजगारसध्या एकूण २३० परप्रांतीय मच्छीमारांकडे अपुरी कागदपत्रे आहेत. त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत त्यांना समुद्रात बंदी आहे. त्यामुळे या कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे. सागरी सुरक्षा धोक्यात घालून कोणालाही मासेमारी करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी सूचना प्रशासनाने किनारपट्टीला दिला आहे..सागरी प्रवाशांचीही तपासणीमांडवा–गेटवे ऑफ इंडिया, दिघी–आगरदंडा, रेवस–करंजा या प्रमुख जलमार्गांवर प्रवाशांच्या तपासणीतही वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मच्छीमार बंदरांवर संशयास्पद हालचाली, अनोळखी व्यक्ती आणि ओळख नोंदणी नसणाऱ्यांवर सुरक्षा यंत्रणांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यासाठी या बंदरांमध्ये तपासणीसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे..सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचा निर्णय अत्यंत योग्य आहे. अशाही परिस्थितीत ज्यांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत त्यांना दरवर्षी काही दिवसांची मुदत दिली जाते. परंतु यंदा ही तपासणी अधिक कडक केली जात आहे.- विजय गिदी, चेअरमन, मच्छीमार सोसायटी, राजपुरी.समुद्रात मासेमारीसाठी कोण गेलेले आहे याची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. २३० मच्छीमारांना कागदपत्रे पूर्ण करण्यास सांगण्यात आलेले आहे.- संजय पाटील, सहा. उपायुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, रायगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.