Akola News : ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास देशाच्या प्रगतीचा कणा असून ग्रामीण जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ एक प्रभावी व दूरदर्शी माध्यम ठरेल. या अभियानामध्ये अकोला जिल्ह्याने भरीव कामगिरी करून जिल्ह्याचा लौकिक वाढवावा, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले..जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. ४) जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच तसेच कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या जिल्हास्तरीय कार्यशाळेत श्री. धोत्रे बोलत होते..या वेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त राजीव फडके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते..Samrudhha Panchayat Raj Abhiyan : ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये ग्रामपंचायतींना लाखोची बक्षीस जिंकण्याची संधी.राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आणि ग्रामविकासात लोकसहभाग निर्माण करण्यास हे अभियान नवी ऊर्जा देईल, असा विश्वासही धोत्रे यांनी व्यक्त केला..ग्रामपंचायत स्तरावरील कर भरण्याची सुविधा नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी अकोट पंचायत समितीअंतर्गत रोहणखेड ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या क्यूआर कोड प्रणालीचे अनावरण करण्यात आले..Samruddha Gram Yojana: मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना ग्रामविकासाचा चेहरा ठरेल.आमदार मिटकरी यांनी, प्रत्येक गावाने पुढाकार घेऊन आधुनिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यप्रणाली राबवावी. स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम केल्याशिवाय शाश्वत विकास साध्य होऊ शकत नाही. अधिकारी-कर्मचारी यांनी गावापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली..या वेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना म्हणाल्या, की ग्रामविकासासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत कर वेळेवर भरून नागरिकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. तसेच कर भरण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा.दिगंबर लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी कृषी व यशदा प्रशिक्षक रोहिदास भोयर यांनी सूत्रसंचालन केले. सहायक गटविकास अधिकारी राजेश खुमकर यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.