Jalna News : ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान आहे. ते अधिक बळकट करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आहे. शिवाय त्यांना लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राम पंचायातीनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी केले. .अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा राहणार आहे. गावाचे मूल्यमापन करण्यासाठी तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीस स्वंयमुल्यांकनद्वारे अर्ज सादर करण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदत आहे. तालुकास्तरावरील मूल्यमापन ११ ते २६ जानेवारी , जिल्हा स्तरीय मूल्यमापन २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी, विभागस्तरीय मूल्यमापन १७ ते २७ फेब्रुवारी तर राज्यस्तरीय मूल्यमापन संपूर्ण मार्च महिना दरम्यान होणार आहे..Gram Panchayat Development : ग्रामपंचायतींचा विकास खोळंबला .सुशासन युक्त प्रशासन १६ गुण, सक्षम पंचायत १० गुण, जल समृद्ध , स्वच्छ व हरित गाव १९ गुण , मनरेगा व इतर योजनाशी अभिसरण ६ गुण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण १६ गुण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय २३, लोक सहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे ५ गुण, तर नावीन्यपूर्ण उपक्रम ५ गुण असे एकत्रित १०० गुणांचे हे मूल्यमापन असणार आहे..Samrudhha Panchayatraj Campaign : एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी.पंचायत समितीविभाग स्तरावर प्रथम पुरस्कार १ कोटी, द्वितीय पुरस्कार ७५ लक्ष, तृतीय पुरस्कार ६० लक्ष, राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार २ कोटी, द्वितीय पुरस्कार १.५ कोटी, तृतीय पुरस्कार १.२५ कोटी.जिल्हा परिषदराज्यस्तरावर प्रथम पुरस्कार ५ कोटी, द्वितीय पुरस्कार ३ कोटी, तृतीय पुरस्कार २ कोटी. याशिवाय या अभियानाची जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे व कार्यक्रमाची प्रसिद्धी करणाऱ्या विभागातील एका पत्रकारास तसेच अभियानास इन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्यूब या ॲपवर व्यापक प्रसिद्धी देणाऱ्यांनाही गौरविण्यात येणार आहे..ग्रामपंचायततालुकास्तरावर प्रथम पुरस्कार १५ लक्ष , द्वितीय पुरस्कार १२ लक्ष, तृतीय पुरस्कार ८ लक्ष तर दोन ग्राम पंचायतींना विशेष पुरस्कार प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा असणार आहे.जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार ५० लक्ष , द्वितीय पुरस्कार ३० लक्ष ,तृतीय पुरस्कार २० लक्ष .विभाग स्तरावर प्रथम पुरस्कार १ कोटी , द्वितीय पुरस्कार ८० लक्ष ,तृतीय पुरस्कार ६० लक्ष .राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार ५ कोटी , द्वितीय पुरस्कार ३ कोटी ,तृतीय पुरस्कार २ कोटी ..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.