Solapur News : सोलापुरात आयटी पार्क व्हावे, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या १,३४८ सदनिकांचे लोकार्पण करताना आयटी पार्क संदर्भात महत्त्वाचे आश्वासन दिले. ‘आयटी पार्कसाठी तुम्ही उत्तम जागा शोधा, उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे,’ अशी ग्वाही त्यांनी दिली..दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत १,१२८ सदनिका आणि शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत २२० अशा एकूण १,३४८ सदनिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, शिवाजीराव आढळराव पाटील या वेळी उपस्थित होते..Solapur Development News : दक्षिण सोलापूर मतदार संघाला २५० कोटींचा निधी मिळाला.श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पुरवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सर्व जाती-धर्मांतील गरीब कुटुंबांना निवारा देण्यासाठी सरसकट सगळ्यांसाठी पंतप्रधान घरकुल योजना सुरू केली. .Solapur Development Plan : ‘डीपीसी’तील कामांना मेमध्येच मान्यता.त्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी ३० लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे.’’ एक महिन्यापूर्वी १५ लाख कुटुंबांना घरे देण्यात आली असून उर्वरित घरे पुढील दोन वर्षांत पूर्ण केली जातील, असेही ते म्हणाले.या कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख यांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना सोलापूरसाठी दिलेल्या निधीबद्दल कौतुक करताना, शहरात आयटी पार्क व्हावे, ही अनेक वर्षांची मागणी असल्याचे नमूद केले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयटी कंपन्या सोलापुरात आणण्याची ग्वाही दिली. पालकमंत्री गोरे यांचेही भाषण झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.