Maharashtra Rains: राज्यातील काही भागातील पूरस्थिती आता नियंत्रणात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आज सकाळी (दि. २९ सप्टेंबर) मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांतील विसर्ग याचा आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे..जायकवाडी धरणातून १,८८०० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. सुदैवाने पाऊस बंद झाल्याने आता विसर्ग वाढविण्याची गरज नाही. आज रात्री ८ पर्यंत हे पाणी नांदेडपर्यंत पोहोचेल. यामुळे सर्व संबंधित जिल्हाधिकार्यांना यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत..येलदरी धरणातून २९,४०० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. मांजरा आणि तेरणा नद्यांचा पूर आता ओसरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील स्थितीही नियंत्रणात आहे. उजनीतून ७५ हजार आणि सीना कोळेगावमधून ८० हजार क्युसेक इतका विसर्ग होत आहे..Maharashtra Rains : राज्यातील काही भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर; २४ तासांत १० जणांचा मृत्यू, जाणून घ्या कुठे कुठे पाऊस? .नाशिकमधील गंगापूर धरणातून ११ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. मुळा धरणातून १० हजार क्युसेक विसर्ग होत आहे. पाऊस आता कमी झाल्याने जायकवाडी धरणातून, नाशिक, नगर भागातील धरणातून विसर्ग ८७ हजारांवरुन ६८ हजार क्युसेकवर नियंत्रित करण्यात आला आहे..जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून ५४,५०० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. हतनूर धरणातून ६५,८०० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. कोकणातील सर्व नद्या आता इशारा पातळीच्या खाली असल्याचे सांगण्यात आले आहे. .भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. .Maharashtra Rain : दसऱ्यानंतरच पाऊस ओसरणार.सरसकट पंचनामे करण्याचे आदेशअतिवृष्टीने राज्यातील अनेक भागांत शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका सोलापूर, मराठवाड्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत. .एकनाथ शिंदेंनी गोदावरी काठावरील गावकऱ्यांना दिला धीरदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील लोकांशी व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील ३२ गावे ही गोदावरी नदी काठावर वसली आहेत. जायकवाडी धरणातून कालपासून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधीत झाले आहेत. जवळपास ५ ते ७ हजार नागरीकांना स्थलांतरीत करावे लागले आहे. काही लोक आवाहन करुन ही रात्री गावाबाहेर पडले नाहीत. त्या सर्वांना आज पहाटे रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. या गावकऱ्यांना सुखरूप वाचवल्यानंतर त्यांच्याशी शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. यावेळी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच वारंवार पुराचा धोका सभवंत असल्याने गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची वाढवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील असे त्यांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.