Ahilyanagar News: खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर रब्बी हंगामातही संकट कोसळले आहे. एकीकडे रब्बी पिकांसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताचा तुटवडा झाला आहे. दुसरीकडे सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कांद्यासारख्या खर्चिक पिकाला बदलत्या हवामानामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. वाढीव खर्च केल्यानंतर दराचा मेळ कसा बसणार या प्रश्नाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे..टाकळीभान परिसरात यंदा मुबलक पाण्यामुळे ऊस लागवड, कांदा, गहू, हरभरा, मकालागवड मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. ढगाळ हवामान कीडरोगासाठी पोषक आहे..Farmers Crisis: मळणीला आला वेग; अतिवृष्टीने घटला तुरीचा उतारा.कांदा पिकावर करपा, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव झाला आहे. गव्हावर मावा, तसेच हरभरा व मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊन पिकांना फटका बसला आहे. यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे..Farmer Crisis: महाग कृषी निविष्ठांमुळे बागायतदारांचा खर्च वाढला.कांदा पिकाला लागवड ते काढणीपर्यंत तब्बल ६० ते ७० हजार रुपये खर्च येत असताना औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ व उत्पादनात होणारी घट यामुळे कांदा काढणीनंतर दराचा मेळ कसा बसणार या प्रश्नात शेतकरी चिंतातूर झाला आहे. खरिपात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रब्बीवर होती..सततच्या ढगाळ हवामानामुळे पिके रोगांच्या तडाख्यात सापडत आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी महागडे कीटकनाशक, बुरशीनाशक,अळीनाशकांची फवारणी करत आहे. त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे.- श्रीकांत भणगे, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.