Pune News: पुणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून रविवारी (ता. ४) सकाळपासून आकाश ढगांनी झाकलेले होते. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर दिसून येत असून गहू, हरभरा, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटांनी हैराण झालेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे..जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख ८७ हजार ६९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून यापैकी १ लाख ३४ हजार १५३ हेक्टर म्हणजेच सुमारे ७१ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या गहू व ज्वारी पिके वाढीच्या अवस्थेत असून ज्वारी कणसाच्या अवस्थेत आहे, तर हरभरा पीक घाट्याच्या अवस्थेत आहे..Weekly Weather: थंडीची तीव्रता कमी-अधिक राहण्याची शक्यता.जिल्ह्यात अनेक भागांत कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण तर कधी थंडी असा अनुभव येत आहे. या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे ज्वारी, हरभरा व भाजीपाला पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेषतः ढगाळ वातावरणामुळे विविध अळ्यांचे आक्रमण वाढत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता रब्बी पिके जोमात येत असतानाच ढगाळ हवामानाने अडचणी वाढवल्या आहेत..हवामानातील अनिश्चिततेमुळे फवारण्यांचे प्रमाण वाढले असून त्याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत आहे. गेल्या काही दिवसांत वाढलेली थंडी गहू व हरभरा पिकांसाठी पोषक ठरत होती. मात्र, पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीची तीव्रता कमी-जास्त होत असून कांदा पिकांवर करपा, आकडी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे..Maharashtra Weather Update: अंशतः ढगाळ हवामान, थंडी ओसरली.रोग व अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके फवारावी लागत असल्याने आर्थिक ताण वाढत आहे. गेल्या महिन्यापासून रब्बी पेरण्यांना वेग आला असून ज्वारी व हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र सध्याच्या ढगाळ हवामानामुळे पुढील काळात पिकांचे आरोग्य टिकवणे हे मोठे आव्हान ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे..माझ्याकडे एकूण २० एकर शेती असून त्यापैकी सात ते आठ एकर क्षेत्रावर कांदा पीक आहे, तर एक एकरवर गहू आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने कांद्यावर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे वारंवार फवारण्या कराव्या लागत असून उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. भाऊसाहेब पळसकर, प्रगतिशील शेतकरी, करडे, ता. शिरूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.